आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारा वर्षे सेवा, पगार नाही; चालकाचे मान्यतेवर बाेट, शिक्षिकेने घेतले विष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी येथील खासगी रुग्णालयात अाश्रमशाळेच्या शिक्षिका वैशाली जाधव यांच्यावर उपचार सुरू अाहेत. - Divya Marathi
परळी येथील खासगी रुग्णालयात अाश्रमशाळेच्या शिक्षिका वैशाली जाधव यांच्यावर उपचार सुरू अाहेत.
परळी- पतीच्या निधनानंतर अाश्रम शाळेवर अनुकंपा तत्वावर तब्बल बारा वर्ष काम करणाऱ्या विधवा शिक्षिकेला पगार मिळाल्याने तिने राहत्या घरीच विष घेतल्याची घटना शहरातील धारावती येथे घडली असून येथील खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू अाहेत. पटसंख्या कमी असल्याने पदांना मान्यता मिळत नसल्याचे संस्थाचालक सांगत अाहेत तर समाजकल्याण विभाग शिक्षिकेला सामावून घ्यायला तयार नाही.
परळी तालुक्यातील धारावती येथे परळी-गंगाखेड मार्गालगत महाराष्ट्र विमुक्त जाती शिक्षण प्रसारक मंडळ समाज कल्याण विभागांंतर्गत ३० वर्षांपासुन आश्रमशाळा सुरू अाहे. या शाळेत परळी येथील राजाभाऊ कुंडलिक नाईकवाडे हे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. २३ मे २००३ रोजी त्यांचे निधन झाले होते. निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर अनुकंपा तत्त्वावर राजाभाऊ यांची पत्नी वैशाली मधुकर जाधव यांनी प्रयत्न सुरू केले. बारावी उत्तीर्ण सी.टी.सी.चे शिक्षण पूर्ण केलेल्या वैशाली यांना संस्थेने २००३ मध्ये अधिकृत ऑर्डर दिली. परंतु नंतर डी.एड. पूर्ण करण्याची अटही घातली. त्यानुसार वैशाली यांनी संस्थेची डी.एड.ची अटही पूर्ण केली.
पतीच्या मृत्यूनंतर नातेवाइकांकडून होणारी मदत तुटपुंज्या पेन्शनवर वैशाली या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत अाहेत. मुली ऋतुजा सहावी तर स्नेहा अकरावीत शिकत आहेत. दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा खर्च घर किराया यातूनच त्या भागवतात. ज्या अाश्रमशाळेत त्या शिकवतात तेथून मात्र तेरा वर्षांपासून त्यांना पगार मिळालेला नाही. थकीत पगारासाठी वैशाली यांनी १४ ऑगस्ट २०१३ रोजी बीड येथे समाजकल्याण कार्यालयासमोर उपोषण केले होते. तीन दिवसांनंतर संस्था चालकाने लेखी अाश्वासन दिल्याने त्यांनी उपोषण सोडले. उपलब्ध पदास मान्यता घेणे पदनिर्मितीनुसार पदावर घेण्याचे लेखी ठरले होते. परंतु संस्थाचालक सुशील राठोड यांनी याकडे गांर्भीयाने लक्ष दिले नसल्याचा आरोप शिक्षकेने केला. पाठपुरावा करूनही संस्थाचालक समाजकल्याण अधिकाऱ्यांनी पगार सुरूच केला नाही. वैशाली यांनी गुरुवारी संस्थेचे सचिव सुशील राठोड यांची भेट घेऊन पगार काढण्यासाठी विनंती केली. त्यावर संस्थाचालकांनी अधिकाऱ्यांना भेटून काम करतो असे उत्तर दिले. शाळेत ते १२ वी पर्यंत शिक्षणाची सोय असून ३६० विद्यार्थी निवासी शिक्षण घेतात.

आम्ही आंदोलन करू
अाश्रमशाळेचे संस्थाचालकअाणि समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शिक्षिकेवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अनुकंपा तत्त्वावरील पदे तत्काळ भरली जावीत असा शासनाचा नियम असतानाही तिला बारा वर्षांत न्याय मिळत नाही हे दुर्दैव अाहे. शिक्षिकेला तत्काळ न्याय द्यावा नसता आंदोलन करावे लागेल'' पी.एस.घाडगे, अध्यक्ष,मराठवाडा शिक्षक संघ.

प्रस्ताव पाठवला
पदमान्यतानसल्यामुळेआश्रम शाळेवरील शिक्षिका वैशाली जाधव यांना संस्थेने नोकरीत सामावून घेतलेले नाही. या शिक्षिकेच्या पदाला मान्यता मिळावी असा प्रस्ताव मुख्य कार्यालयाला पाठवला आहे. जागा उपलब्ध होईल तेंव्हा विचार हाेईल. शिक्षिकेची भेट घेऊन चाैकशी केली.'' रवींद्र शिंदे, सहायकआयुक्त, समाजकल्याण, बीड
संस्थाचालकासह अधिकाऱ्यांचे माैन
यंदाप्राथमिक आश्रमशाळेची पटसंख्या ३२६ असून शाळेत एक मुख्याध्यापक, आठ प्राथमिक शिक्षक, एक सेवक एक लिपीक कार्यरत आहेत. दोन वर्षात एक शिक्षक एक सेवा निवृत्ताचा मृत्यू झाला आहे. दोन जागा रिक्त झाल्या असुन विद्यार्थी संख्येची अट घालून समाज कल्याण अधिकारी महिलेला शिक्षक पदावर सामावून घेत नाहीत. अशा परिस्थितीत यंदा शासनाने संस्थेने शिक्षक भरती करू नये असा नियम काढला आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, केव्हा आणि कोठे घेतले वीष... का दिला आत्म दहनाचा इशारा...