आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : मुलींची छेड; शिक्षकाला दामिनी पथकाने पकडले, हिमायत बागेजवळील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील गणिताच्या शिक्षकाने विद्यार्थिनींशी केलेला लंपटपणा चव्हाट्यावर आलेला असतानाच अशीच एक घटना हिमायत बागेत घडली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ थांबून मुलींची छेड काढणाऱ्या शिक्षकाला शनिवारी सकाळी दामिनी पथकाने सापळा रचून अटक केली.
 
अन्सारी मोहंमद अब्दुल माजेद (३७, रा. राहत कॉलनी) असे त्याचे नाव आहे. मागील चार-पाच दिवसांपासून बाहेरून येऊन एक व्यक्ती आमचा पाठलाग करत असल्याची तक्रार आठवी, नववीच्या विद्यार्थिनींनी शिक्षकांकडे केली होती. शाळेच्या शिक्षकांनी ही माहिती दामिनी पथकाला कळवली. त्यानुसार दामिनी पथक पाळत ठेवून होते. शनिवारी सकाळी हा शिक्षक शाळेजवळ येताच त्याला चार्ली संभाजी पवार, जाधव यांनी ताब्यात घेतले. या वेळी दामिनी पथकाच्या स्वाती बनसोडे, कोमल निकाळजे, संगीता रिठ्ठे, पूनम झाल्टे उपस्थित होते. छेड काढणारी ही व्यक्तीही एका इंग्रजी शाळेत शिक्षक असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. त्याचे लग्न झाले असून त्याला मुलेही आहेत. पीडित मुलींनी घडलेली सर्व घटना पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे, पोलिस निरीक्षक वसीम हाश्मी यांना सांगितली. अन्सारीवर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जवाहरनगर पोलिसांनी तीन मुलींचा जबाब नोंदवला : दरम्यान,गणिताच्या शिक्षकाने छेडछाड केल्याच्या प्रकरणात जवाहरनगर पोलिसांनी शनिवारी तीन मुलींचा जबाब नोंदवला. पोलिस उपनिरीक्षक मीरा लाड यांनी शाळेत जाऊन पालकांच्या उपस्थितीत तक्रारदार मुलींची विचारपूस केली. दरम्यान, आरोपी पोलिस कोठडीत असून त्याचीही चौकशी केली. दरम्यान, तो शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात यापूर्वी प्राध्यापक होता, असे पोलिसांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...