आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेचे अध्यक्षसुद्धा शिक्षक आल्यानंतर उभे राहतात : चोपडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिक्षकांवरिवद्यार्थ्यांचा भार असतो. शिक्षकच भावी पिढी घडवू शकतो. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षही शिक्षक आल्यानंतर उभे राहतात. त्यामुळे शिक्षकांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले.

शिक्षक दिनानिमित्त एमजीएम संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील मिसकॉन सभागृहात शिवा ट्रस्टच्या वतीने मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी कुलगुरू बोलत होते. व्यासपीठावर शिक्षक आमदार विक्रम काळे, उल्हास उढाण, सुनीता चव्हाण, छाया जंगले, वीणा खरे, डॉ. कांचन देसरडा, गझला जमादार, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, मनमोहनसिंग ओबेरॉय, जेएनईसीचे प्राचार्य डॉ. सुधीर देशमुख, डॉ. अविनाश येळीकर, डॉ. पवन डांगरे, डॉ. बाळासाहेब पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले, बराक ओबामासुद्धा शिक्षक आल्यानंतर उभे राहतात. असा आदर आपल्या देशातही व्हावा. आमदार विक्रम काळे म्हणाले की, शि क्षणाचा केंद्रबंदू विद्यार्थी आहे. त्यांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी तत्पर आहे. आज शिक्षकांमुळेच निवडून आल्याने त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करू, असे आश्वासन त्यांनी दिले. मीसुद्धा एक शिक्षक असून ज्या महामानवाच्या नावाने विद्यापीठाची उभारणी झाली त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतून राज्यघटनाही साकारली. डॉ. आंबेडकरांचा आदर्श आजच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे मत एमजीएम संस्थेचे विश्वस्त डॉ. पी. एम. जाधव यांनी मांडले. उल्हास उढाण म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोठ्या व्यक्तींचा आदर्श ठेवावा. या वेळी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, आमदार विक्रम काळे, उल्हास उढाण यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. शंतनू पवार, नामदेव साबळे, प्रा. दिनेश पाथ्रीकर, डॉ. कैलास पाथ्रीकर,जनसंपर्क अधिकारी संजय शेटे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब पवार यांनी केले, तर आभार डॉ. शंतनू पवार यांनी मानले. उद्घाटन करताना आमदार विक्रम काळे, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, उल्हास उढाण, सुनीता चव्हाण, छाया जंगले, वीणा खरे, डॉ. कांचन देसरडा, गझला जमादार आदी.