आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यापीठाचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शुक्रवारी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, बीसीयुडीचे संचालक डॉ. के. व्ही. काळे, कुलसचिव डॉ. धनराज माने, व्यवस्थापन परिषद सदस्य उल्हास उढाण, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. रत्नदीप देशमुख, डॉ. गीता पाटील, कॅप्टन सुरेश गायकवाड, डॉ. सय्यद अझरुद्दीन, डॉ. किशन धाबे, डॉ. धर्मराज वीर यांची उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले की, भारतामध्ये प्राचीन काळापासून सामाजिक परिवर्तनात शिक्षकांचे योगदान राहिले आहे. भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर हेही त्या काळातील गुरू आहेत. नालंदा, तक्षशीला सारखी जगातील आद्य विद्यापीठे भारतातच आहेत. गुरू- शिष्य नाते जपणारी गुरुकुल परंपरा ही आपणच जगाला दिलेली देण आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अध्ययन, अध्यापन संशोधन ही तीनच कामे शिक्षकाने आयुष्यभर केली पाहिजेत, असे
विचार मांडले. बाबासाहेबांच्या या विचाराने पुढे जाऊन आपण विद्यापीठाला पुढे नेऊ, असा विश्वास या वेळी त्यांनी व्यक्त केला. या वेळी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते डॉ. हमीद खान, डॉ. बापू शिंगटे, डॉ. भारती गवळी, डॉ. एम. डी. सिरसाट, डॉ. एस. एम. हेळंबे, डॉ. मिलिंद पंडित, डॉ. संजय अस्वले, डॉ. विद्यासागर पाटांगणकर, डॉ. नारायण बोराडे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची भूमिका कुलसचिव डॉ. माने यांनी मांडली. डॉ. राजेश करपे यांनी सूत्रसंचालन केले.