आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक, कर्मचाऱ्यांची तब्बल ३०७ पदे रिक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ७७७ मंजूर पदांपैकी ५४६ कर्मचारी कार्यरत आहेत. २५९ प्राध्यापकांपैकी १८६ कार्यरत असून प्राध्यापकांचे ७३ तर कर्मचाऱ्यांची २३४ पदे रिक्त असल्यामुळे विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान पदे भरण्यात येतील अशी माहिती आहे.
बनस्पतिशास्त्र विभागात १४ शिक्षकांची पदे मंजूर असून त्यापैकी सध्या फक्त तीन जण अध्यापन करत आहेत. विभागप्रमुख डॉ. अरविंद धाबे, डॉ. मिलिंद सरदेसाई आणि डॉ. पंडुरे यांच्यावरच विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी आहे. पदे भरण्यासंदर्भात डॉ. धाबे यांना विद्यापीठ प्रशासनाने कळवले आहे. त्याशिवाय भूगोल विभाग तर एकाच शिक्षकावर कार्यरत आहे. डॉ. मदन सूर्यवंशी विभागप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. पाली अँड बुद्धिझम, जनसंवाद वृत्तपत्रविद्या विभाग, संगीत, परकीय भाषा, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आदी विभागातदेखील शिक्षकांची वानवा आहे. त्यामुळे रिक्त झालेली ७३ पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांची २३४ पदेही ऑक्टोबरपर्यंत भरली जाण्याची शक्यता आहे. कार्यरत असलेल्या ५४६ पैकी ९८ कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यग्र असून त्यामुळे विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम होत असल्याची माहिती आहे.