आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोषी शिक्षक बाहेर, सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणाऱ्यांवर कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ज्यांच्या हातात दगड होते, जे खऱ्या अर्थाने दोषी आहेत, असे गुन्हेगार बाहेर असून सोशल मीडिया, व्हाॅट्सअॅप यावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियाच शिक्षकांच्या अंगलट आल्या आणि दगडफेकीनंतर झालेल्या लाठीहल्ल्यात पोलिसांनी अनेक शिक्षकांना पकडले, काही कारवाईच्या भीतीचे भूमिगत झाले आहेत.
ऑक्टोबर रोजी औरंगाबादेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिक्षक कृती समितीने प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. सोळा वर्षांपासून विनावेतन नोकरी करणाऱ्या शिक्षकांना वाटले, शिक्षणमंत्री विनोद तावडे भेटतील आणि आपले दु:ख एेकून घेतील; पण घडले विपरीतच. शिक्षणमंत्री शिक्षकांना भेटण्यासाठी आलेच नाही. उलट शिक्षकांवरच लाठीमार करण्यात आला. घटनेनंतर अडीचशेहून अधिक शिक्षकांवर ३०७ कलम लावण्यात आले. या लाठीहल्ल्यात गरोदर असणाऱ्या महिला शिक्षिकांनाही मारहाण झाली. ५९ शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी ४७ जणांना जामीन मिळाला, तर १२ जण हर्सूल कारागृहात आहेत. दरम्यान, या सर्व प्रकारामध्ये जे दोषी आहेत, असे शिक्षक भूमिगत झाले आहेत. अशा परिस्थितीतही काही नेते आपली पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.

उपोषणात सर्व संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अजमल खान, सय्यद नाजेरोद्दीन, राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद पाटील, प्राचार्य अशोक तांबटकर, प्रल्हाद शिंदे, संदीप भदाणे, प्रकाश दाणे, डॉ. एन. डी. नांद्रे, प्रकाश वाघमारे, प्रा. सय्यद मन्सूर, उमेश शिंदे, संतोष जाधव, संजय ढोकणे पाटील, टी. एस. चव्हाण यांनी केले आहे.

उपोषणाचा इशारा
शिक्षकांवर नोंदवलेला गुन्हा मागे घेण्यात यावा या मागणीसाठी १४ ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर माजी शिक्षक आमदार जयवंतराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे उपोषण करण्यात येणार आहे, असा इशारा अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेने दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...