आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोर्चा प्रकरण : ४७ शिक्षकांची सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादेतील मंत्रिमंडळ बैठकीवरील मोर्चात पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी हर्सूल कारागृहात पाठवलेल्या ४७ शिक्षकांची अंतरिम जामिनावर सुटका करण्यात आली.
४ ऑक्टोबरला आमखास मैदानावर चकमकीनंतर शिक्षकांनी केलेल्या दगडफेकीत १७ पोलिस जखमी झाले. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शोध मोहीम हाती घेत ५९ शिक्षकांना अटक केली. त्यातील ४७ जणांची हर्सूल कारागृहात तर १२ जणांची पोलिस कोठडीत रवानगी झाली हाेती. ३०० जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल अाहे. अटकेतील शिक्षकांनी अॅड. ए. टी. पटेल, अॅड. एन. एस. घाणेकर, अॅड. सय्यद अक्रम, किरण कुलकर्णी यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला हाेता.
बातम्या आणखी आहेत...