आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दगडफेक करणाऱ्या ४७ शिक्षकांना दिवसांनंतर अंतरिम जामीन मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - मंत्रिमंडळ बैठकीवर काढलेल्या मोर्चात पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी ४७ शिक्षकांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यांना जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी २० ऑक्टोबरपर्यंत नियमित अंतरिम जामीन मंजूर केला. ११ ऑक्टोबर रोजी आदेशाची प्रत दाखल केल्यानंतर शिक्षकांना सोडण्यात येईल. सायंकाळी कुटुंबासोबत दसरा साजरा करण्याची संधी त्यांना मिळू शकते. मात्र, त्यांना जामीन कायम करण्यासाठी २० ऑक्टोबर रोजी न्यायालयासमोर अर्ज करावा लागणार आहे.
ऑक्टोबर रोजी विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांनी १०० टक्के अनुदानाच्या मागणीसाठी मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढला होता. तो आमखास मैदानावर आल्यावर मोर्चेकऱ्यांची पोलिसांशी चकमक उडाली. पोलिसांनी बळाचा वापर करताच शिक्षकांनी दगडफेक केली. त्यात १७ पोलिस जखमी झाले. बंदोबस्तासाठी तैनात एका पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी विविध ठिकाणी शोधमोहीम हाती घेत अनेक शिक्षकांना अटक केली. पहिल्या टप्प्यात ४७ शिक्षकांवर भादंवि कलम ३०७ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या शिक्षकांनी अॅड. नीलेश घाणेकर, अॅड. किरण कुलकर्णी, अॅड. सय्यद अक्रम यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. अॅड. नागेश सोनवणे, अॅड. तथागत कांबळे यांनी साहाय्य केले.

यांना मिळाला जामीन
सुरेश आसाराम मोरे (बुलडाणा), सुनील दुमाले (वसमत), सिद्धार्थ कोंगराव (परभणी), तुकाराम कदम (परभणी), गजानन देशमुख (परभणी), मुंजाजी शिंदे (परभणी), विलास आवारे (बीड), अर्जुन श्रीरंग पाखरे (रांजणगाव शेणपुंजी ), शे. मोबीन शे. फारूख (मुदखेड), शे. इर्शाद शेख हसन (लोणार), इरफानखाँ गौरखाँ (वाशीम), शे. नय्युम शे. कय्युम (वाशीम), अर्जुन रावसाहेब वळसकर (आै.बाद), सईदखाँ हमीदखाँ (वाशीम), मो. नदीम मो. इसूफ (वाशीम), लक्ष्मण घ्यार (हिंगोली), संतोष राठोड (नांदेड), सुरेश यादव गवई ऊर्फ गवळी (आै. बाद), चतुर्भुज अंकुश लोकरे, महादेवविश्वनाथ वट्टे, प्रवीण बप्पासाहेब काळे, विलास समाधान गुंगे (सर्व उस्मानाबाद), रामेश्वर विठ्ठलराव पवार (वाशीम), अनिल शंकर बावस्कर (नंदुरबार), विजय राधाकृष्ण द्वारकुंडे (आैरंगाबाद ), गणेश बाळासाहेब पवार (आै.बाद), श्रीकांत सीताराम गरुड (परभणी), संतोष देशमुख (बीड), सुबराव पवार (बीड), संदीप किरडकर (अकोला), संदीप पवार , अनिल पवार (नाशिक), अमर विलास पाटील (कोल्हापूर), भाऊसाहेब तेजराव काळे (आै.बाद), आदिनाथ नामदेव अडसरे (आै.बाद), सचिन विनायकराव पाचबोले (अकोला), मच्छिंद्र शिवाजी जाधव (कोल्हापूर), प्रदीप अण्णासाहेब कोळी (कोल्हापूर), नीलेश वसंत गरुड (नाशिक), कैलास प्रल्हादराव पाबळे, राहुल भोसले, भास्कर कड, शंकर उकिरडे, सोमनाथ भाेपळे, रमेश उकिरडे, गणेश शेळके, भारत शेळके (सर्व जालना) आदींचा समावेश आहे.
१२ शिक्षक हर्सूल कारागृहात
दरम्यान,दगडफेक करून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल ४ऑक्टोबर रोजी अटक केलेल्या १२ जणांची १४ दिवसांसाठी हर्सूल कारागृहात रवानगी करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए.जी. एम. शेख यांनी दिले. या शिक्षकांची सोमवारी पोलिस कोठडी संपली होती. हर्सूलला पाठवण्यात आलेल्या शिक्षकांची नावे अशी : सीताराम उंधळ्या म्हसकर (रा. मोपाड, जि. रायगड), मनोज शिवाजी पाटील (रा. बालाजीनगर, औरंगाबाद), खंडेराव शिवाजी जगदाळे (रा. शिरोळे, जि. कोल्हापूर), शिवराम विश्वनाथ म्हस्के (रा. द्वारकापुरी, आैरंगाबाद),
वाल्मीक सखाराम सुरासे (रा. तिरुपती पार्क, औरंगाबाद), रवींद्र पदमसिंग मंडावर (रा. वैजापूर), मिर्झा सलीम बेग (रा. सादातनगर, औरंगाबाद), अन्सारी मोहंमद जावेद (रा. आसमिरा टाऊनशिप, आैरंगाबाद), अभिजित दिनकर कदम (रा. पूर्णा), रमेश सदाशिव देशमुख (रा. परभणी), संंदीप रामधन देवरे (रा. गारखेडा, औरंगाबाद), दीपक विठ्ठल इंगळे (रा. सातगाव म्हसला, जि. बुलडाणा).
बातम्या आणखी आहेत...