आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांचे वेतन ऑनलाइन होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शासकीय अनुदान प्राप्त करणार्‍या सर्वच शाळांतील शिक्षकांचे वेतन फेब्रुवारी महिन्यापासून ऑनलाइन करण्यात येणार आहेत. वेतनासंदर्भात ‘शालार्थ’ प्रणाली लागू करण्यात आली असून औरंगाबाद विभागातील 20 हजार शिक्षकांचे वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेला बँकेतील खात्यात जमा होईल.

शिक्षकांचे पगार ऑनलाइन व्हावेत, अशी मागणी शिक्षक संघटनांतर्फे करण्यात येत होती. त्या प्रमाणे दोन टप्प्यांत योजना राबवण्याचे ठरवण्यात आले. पहिल्या टप्प्यात पुणे, लातूर, अकोला, परभणी, ठाणे या जिल्ह्यांत योजना राबवण्यात आली, तर दुसर्‍या टप्प्यात औरंगाबादसह सर्वच ठिकाणी शिक्षकांचे पगार बँकेत जमा केले जातील. बँक खाते उघडण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे शिक्षक सुभाष मेहर यांनी सांगितले, तर फेब्रुवारीपासून वेतन ऑनलाइन होईल, अशी माहिती शिक्षण उपसंचालक सुखदेव डेरे यांनी दिली.