आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तंत्रनिकेतनच्या प्रवेशास प्रारंभ; पहिली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 7 जुलै रोजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिलाच दिवस असल्याने महाविद्यालयाचा परिसर विद्यार्थी आणि पालकांनी फुलून गेला होता. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज भरावयाचा आहे. सकाळी दहा वाजेपासून विद्यार्थ्यांना अ‍ॅप्लिकेशन किट देण्यात आली. 27 जून ते 6 जुलैपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर एआरसीला जाऊन तो निश्चित करावयाचा आहे. शहरात दहापेक्षा अधिक एआरसी सेंटर देण्यात आले आहेत.

तंत्रशिक्षण संचालनालयाने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहा दिवस उशिरा प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे कॉलेजेसही उशिराच सुरू होतील. विद्यार्थ्यांना नोंदणी आणि निश्चितीसाठी दहा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. एआरसी सेंटरवर माहिती पुस्तिकेसह अ‍ॅप्लिकेशन किट देण्यात आली. अ‍ॅप्लिकेशन किटमध्ये विद्यार्थ्यांना लॉगइन आयडी आणि पासवर्ड देण्यात आला आहे. त्यावरून आॅनलाइन अर्ज भरायचा आहे. ही प्रक्रिया 6 जुलैपर्यंत पूर्ण करायची आहे. त्यानंतर पहिली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 7 जुलै रोजी जाहीर होईल.
8 ते 10 जुलैपर्यंत आक्षेप मागवण्यात येतील. 10 जुलै रोजी जागा विभागणी, तर 12 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर झळकेल. कॅप राउंड वनमध्ये 14 ते 17 जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना आॅप्शन फॉर्म भरावा लागेल. कॅप राउंड एकची पहिली प्रोव्हिजनल लिस्ट 19, तर 21 ते 23 जुलैपर्यंत प्रवेश कन्फर्मेशन करावयाचे आहे.

25 जुलै रोजी सेकंड राउंडसाठी रिक्त जागांची यादी जाहीर केली जाईल. कॅप राउंड दोन 26 ते 28 जुलैदरम्यान होईल. प्रोव्हिजनल अलॉटमेंट 30 जुलैला, तर 31 जुलै ते 2 आॅगस्टदरम्यान रिर्पोटिंगसाठी देण्यात आले आहेत. तिसरा राउंडसाठी रिक्त जागा व पात्र विद्यार्थ्यांची यादी 4 आॅगस्ट रोजी जाहीर होईल. तिसर्‍या फेरीतच सबमिशन अँड कन्फर्मेशनची प्रक्रिया 5 ते 7 आॅगस्टदरम्यान होईल. संस्थेमध्ये रिर्पोटिंगसाठी विद्यार्थ्यांना 11 ते 13 आॅगस्टची मुदत देण्यात आली आहे. 16 आॅगस्ट रोजी चौथ्या फेरीसाठी रिक्त जागा व विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. 20 आॅगस्ट रोजी शेवटची समुपदेशन फेरी होणार असून ती जिल्हास्तरावर होणार आहे.

विद्यार्थ्यांना 20 ते 23 आॅगस्ट रोजी प्रवेश निश्चित करायचा आहे. अर्ज प्रक्रियेसाठी खुल्या गटासाठी 250 रुपये, तर राखीव गटासाठी 150 रुपये शुल्क आकारण्यात आले आहेत.
फोटो - शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या आहेत. छाया : रवी खंडाळकर