आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Techniqual, Industrial, Sports Special University For This

तंत्र, व्यावसायिक, क्रीडा या शिक्षणाची स्वतंत्र विद्यापीठे होणार स्थापण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यात व्यावसायिक, तंत्रशिक्षण व क्रीडा शिक्षणाची तीन स्वतंत्र विद्यापीठे स्थापन केली जाणार आहेत. राज्यातील कुलगुरूंच्या संयुक्त परिषदेत राज्यपालांनी अशा विद्यापीठांची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तिन्ही विद्यापीठांना तातडीने मान्यता देत आश्वासन दिले. तसेच प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली. यातील एक विद्यापीठ औरंगाबादमध्ये व्हावे म्हणून पाठपुरावा करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

राजभवनात 2 सप्टेंबरला रोजी ही परिषद झाली. या वेळी राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री टोपे, राज्यमंत्री डी. पी. सावंत, राज्यातील सर्व कुलगुरू उपस्थित होते.

टोपे म्हणाले, राज्यात तिन्ही प्रकारची विद्यापीठे असावीत अशी अपेक्षा राज्यपालांनी परिषदेत व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत आश्वासन दिले. मुळात व्यावसायिक शिक्षण (व्होकेशनल) व तंत्रशिक्षणाच्या (टेक्निकल) विद्यापीठाचा प्रस्ताव तयार आहे. यापैकी तंत्रशिक्षण विद्यापीठ लोणेरी (जि. रत्नागिरी) येथे विस्तारित स्वरूपात होईल, तर व्यावसायिक शिक्षण विद्यापीठ औरंगाबादला सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. क्रीडा शिक्षण विद्यापीठाचा प्रस्ताव तयार करावा लागणार असून, त्यानंतरच ते विद्यापीठ कुठे व्हावे याविषयी ठरू शकेल, असेही टोपे यांनी सांगितले.