आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डेंग्यूमुळे दातांची हाडेही मृत होतात, डॉ. माया इंदूरकर, डॉ. रोहित सेठी यांच्या संशोधनाला जागतिक मान्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डेंग्यूमुळे व्यक्ती दगावण्याबरोबरच त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोकाही अधिक असतो. या आजाराचे दातांवरही दूरगामी परिणाम होऊ शकतात हे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. डेंग्यूच्या रुग्णाच्या जबड्यातील हाडांचा रक्तप्रवाह थांबून हाडे मृत होऊन ते निकामी होण्याची शक्यता बळावते. या आजाराला 'ऑस्टिओनेक्रोसिस ऑफ जॉ' असे म्हणतात. याविषयीचे संशोधन शासकीय दंत महाविद्यालयाच्या दंत परिवेष्टन विभागप्रमुख डॉ.माया इंदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रोहित सेठी यांचा हा शोधप्रबंध ऑस्ट्रेलियन डेंटल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला असून संशोधनाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.

दंत परिवेष्टन विभागात पदव्युत्तर अभ्यास करणारे डॉ. रोहित सेठी यांच्याकडे खुलताबाद येथील ४२ वर्षीय शेतकरी उपचारासाठी आला होता. उपचार करताना लक्षात आले की, त्याच्या हिरड्यांनी हाडांची पकड सोडली आहे. हाडांना होणारा रक्तपुरवठा पूर्णपणे थांबल्याने हाडे मृत झाली होती. अशावेळी दात, हाडे काढून कवळी बसवली जाते. दुसरा रुग्ण धुळे येथील ३८ वर्षीय शेतकरी होता. त्यालाही असाच आजार दिसून आला. याविषयीचा अधिक अभ्यास केल्यानंतर दोघांनाही महिन्यांपूर्वी डेंग्यू झाला होता, हे स्पष्ट झाले. डेंग्यूच्या उपचारानंतरही बराच काळ त्याचे विषाणू शरीरात राहतात. हे विषाणू दातांखालील हाडांवर आक्रमण करतात. या आजाराची कारणे शोधली, तर कर्करोग आणि इतर विशिष्ट प्रकारची औषधी सुरू असलेल्या रुग्णांनाच हा आजार होतो असे समोर आले. मात्र डेंग्यूच्या रुग्णांच्या रुग्णांनाही 'ऑस्टीओनेक्रोसिस ऑफ जॉ' होते, हे डॉ. सेठी यांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले. डॉ. इंदूरकर आणि डॉ. सेठी यांच्या या संशोधनाला ऑस्ट्रेलियन जर्नलसोबतच, इंडियन असोसिएशन ऑफ पेरिओडेन्टॉलॉजी परिषद जयपूर आणि नागपूर येथेही मान्यता मिळाली आहे. लवकरच हे संशोधन सौदी डेंटल जर्नलमध्येही प्रसिद्ध होईल. या यशाबद्दल अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे यांनी अभिनंदन केले आहे.

ज्याप्रमाणे पायगेलेल्यांना जयपूर फूट हा कृत्रिम पाय लावण्यात येतो, तसेच या आजारात जबड्याचे कृत्रिम हाड आणि त्यावर कवळी बसवली जाते. या कवळीची काढघाल करता येते.
- प्रा.डॉ. माया इंदूरकर, शासकीय दंत महाविद्यालय
तीव्र वेदना अन् रक्तस्राव
- अशाआजारातरुग्णाच्या दातांना तीव्र वेदना होतात. हिरड्यांना सूज येऊन रक्तस्राव होतो. हिरड्या हाडांना सोडू लागतात. हा आजार डेंग्यू झालेल्या काही रुग्णांनाच होऊ शकतो.
- डॉ.रोहन सेठी, पदव्युत्तर विद्यार्थी, दंत परिवेष्टन विभाग
बातम्या आणखी आहेत...