आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tejaswini Sagar Get Gold Medal In Chess News In Marathi

औरंगाबादच्या तेजस्विनीचे ‘सुवर्ण’तेज; जागतिक स्पर्धेत अव्वल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- थायलंड येथील जागतिक शालेय बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादच्या तेजस्विनी सागरने गुरुवारी सुवर्णपदक पटकावले. तिने ९ पैकी ७ गुणांची कमाई करत १५ वर्षांखालील गटात ही कामगिरी केली. तेजस्विनीने श्रीलंकेच्या केविन्य मियुनी राजपक्षेला नवव्या फेरीत पराभूत केले. बारबयेवाने रौप्य, तर अव्वल मानांकित इंडोनेशियाच्या नूर अबीदा शांतीला कांस्य मिळाले.दरम्यान, या स्पर्धेची मी आतुरतेने वाट पाहत होते, असे तेजस्विनीने म्हटले आहे.