आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादच्या तेजस्विनी सागरला बुद्धिबळात सुवर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिंगापूर येथील असलेयन एशियन शालेय बुद्धिबळ स्पर्धेत जलदगती प्रकारात औरंगाबादच्या तेजस्विनी सागर हिने सुवर्णपदक पटकावले. १५ वर्षांखालील मुलींच्या गटात ११ पैकी ९.५ गुण मिळवत तिने ही कामगिरी केली. गेल्या महिन्यात तिने जागतिक शालेय स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते. फिलिपाइन्सच्या डोरॉय अॉलनेने रौप्य, तर भारताच्या ईशा शर्मा हिने कांस्य जिंकले. सागरने मियुनी राजपक्षे, दिहारा इशिनी, मेंडिस दाऊनी, के. दिनाली, ते ची शिन, अॅग खिने, अॅनगी विनेन व भारताच्या नागलालक्ष्मी यांना पराभूत केले.