आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानाची पुन्हा उसळी; पारा ४०.८ अंशांवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दोन दिवसांपूर्वी हवेचा वेग वाढल्याने तापमानाची दाहकता दोन अंशांनी कमी झाली होती. रविवारी कमाल तापमान चाळीसवरून ३८ किमान तापमान २७ अंशांवरून २३.२ पर्यंत खाली घसरले होते. पण मंगळवारी हवेचा वेग मंदावला तापमानाने पुन्हा उसळी घेऊन कमाल ४०.८ आणि किमान तापमान २५.६ अंशांवर पोहोचले. उन्हाच्या काहिलीमुळे नागरिक सध्या त्रस्त झाले आहेत.

उत्तर गोलार्ध सूर्याकडे झूकत चालला आहे. परिणामी पृथ्वीचा भूभाग अधिक तापत आहे. सकाळी वाजेपासून उन्हाची तीव्र जाणवायला सुरुवात होते. दुपारी १२ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उन्हाच्या झळा असह्य होत असल्याने बहुतांश लोक घर, कार्यालयाच्या बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. ज्यांना महत्त्वपूर्ण काम आहे असे नागरिक एसीची सुविधा असलेल्या चारचाकी वाहनाचा वापर करत आहेत. दुचाकीस्वार डोक्याला पांढरा रुमाल वरतून हेल्मेट घालूनच बाहेर पडतात. दहा दिवसांनी वैशाख वणवा सुरू होत आहे. त्यानंतर पुन्हा सूर्य आग ओकू लागेल तापमान नवीन उच्चांक पातळी गाठण्याची शक्यता आहे.

तापमानात चढउतार
दक्षिण आशियात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाज क्लायमेट आऊटलूक फोरमने वर्तवला आहे. तत्पूर्वी जसजसा मान्सून जवळ येत जाईल तसतसे तापमानातही कमालीचा चढ-उतार अनुभवायला मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावर्षी सर्वच हवामान वर्तवणाऱ्या संस्थांनी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच पिकांचे नियोजन करणे हिताचे ठरेल. तसेच पावसाच्या खंडात पाण्याचे जलपुनर्भरण करणेदेखील गरजेचे आहे.
उन्हाचा तडाखा बसत असून यापासून वाचण्यासाठी एका दुचाकीस्वाराने अशी शक्कल लढवली. छाया : मनोज पराती