आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचव्या दिवशीही पारा ४१ अंशांवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सूर्य तळपू लागल्याने रविवारी पाचव्या दिवशीही शहराचे तापमान ४१ अंश सेल्सियसवर स्थिर होते. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना उन्हाचे चटके बसत आहेत. परिणामी उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी लोक दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळत असल्याने रस्ते निर्मनुष्य होत आहेत. बाजारपेठ, शासकीय- निमशासकीय कार्यालयांतील गर्दीलाही सायंकाळी पाच वाजेपर्यंत चाप बसला आहे. पुढील तीन ते चार दिवस आकाशात ढगांची गर्दी होण्याची शक्यता आहे. पारा मात्र चढाच राहील, असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे.