आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारा एकेचाळीस अंशांवर पोहोचला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हवामानात अनपेक्षित आणि वेगाने बदल होत दोन दिवसांपूर्वी घसरलेला पारा पुन्हा ४१ अंश सेल्सियसच्या वर गेला आहे. हवेचा वेग वाढल्याने रविवारी चाळिशीत असलेला पारा दोन अंश सेल्सियसने किंचित घटून ३८ अंशांपर्यंत खाली आला होता. मात्र, दोन दिवसांपासून हवेचा वेग मंदावल्याने मंगळवारी कमाल तापमान ४०.८ तर किमान २५.६ अंशांवर पोहोचले होते. बुधवारी तापमानात पुन्हा एक अंशाने वाढ होऊन ते कमाल ४१. आणि किमान २६ अंशांवर गेले आहे. दिवस रात्रीच्या उकाड्याने लोक कासावीस झाले आहेत. पुढे पारा असाच चढत राहिला तर मान्सूनपूर्व जोरदार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.