आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हवामानात बदल: तापमानात 2.2 अंशांनी घसरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: गेल्या दोन दिवसांपासून नैऋत्य मोसमी वारे वाहत असल्याने हवामानात बदल होऊन तापमानात 2.2 अंश सेल्सिअसची घसरण झाली आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाला लगाम लागला असून नागरिकांनाही कडक उन्हापासून दिलासा मिळाला आहे. हवामानातील हा बदल मान्सून वेळेवर येण्याची लक्षणे असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
दोन दिवसांपासून हवेत आद्र्रता वाढली. हवा वाहणे, ढगाळ वातावरण तयार होणे, तापमानात घट होणे यासारखे बदल मान्सून येण्याअगोदर होणे अपेक्षित असते. चार दिवसांपूर्वी तापमान 40.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. मात्र गुरुवार, 31 मे रोजी नैर्ऋत्य मोसमी वारे आपल्याकडे दाखल झाल्याने तापमानात 2.2 अंशांनी घट झाली. हा हवामानातील बदल मान्सून वेळेवर येण्याचे संकेत आहेत, असे राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी हवामान विभागप्रमुख डॉ. रामचंद्र साबळे व अकोला कृषी विद्यापीठाचे डॉ. सुभाष टाले यांनी सांगितले.