आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Temperature News In Marathi, Summer Season, Divya Marathi

शहरातील तापमान 6 अंश सेल्सियसने वाढले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या दोन दिवसांत आकाशात ढगांची गर्दी होत असून उकाड्यात वाढ झाली आहे. 4 एप्रिलला किमान तापमान 21.5 अंश सेल्सियस होते. सोमवारी त्यात सहा अंशांनी वाढ होऊन ते 27.3 अंशांवर पोहोचले. राज्यात सर्वाधिक किमान तापमान शहरात असल्याची नोंद वेधशाळेने घेतली आहे. कमाल तापमान 39.2 अंशांवर आहे.
गारपिटीनंतर वीस दिवस आकाश निरभ्र राहिले. नंतर मात्र सतत तापमान वाढत गेले. दोन दिवसांपासून
वातावरणात बाष्प तयार होऊन आकाशात ढगांची पुन्हा गर्दी होत आहे. ढगांचे आच्छादन कमी जाडीचे असल्यामुळे
सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर येऊन धडकतात.
पृथ्वीवरून उत्सजिर्त होणारी ऊर्जा ढगांच्या गर्दीत रोखली जाते. यामुळे उकाड्यात अधिक वाढ होत आहे. ढगाळ वातावरण आणखी दोन दिवस राहणार असून पुढील दोन दिवसांमध्ये शहराचा पारा चाळिशी ओलांडणार असल्याचा अंदाज या वेळी हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला.
पाच दिवसांतील तापमान
दिनांक किमान कमाल
3 एप्रिल 36.8 22.4
4 एप्रिल 38.6 21.5
5 एप्रिल 39.0 22.4
6 एप्रिल 39.2 23.0
7 एप्रिल 39.2 27.3