आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत मंदिरांच्या तेरा दानपेट्यांना सील, धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने शुक्रवारी औरंगाबादेतील सर्वच मोठ्या मंदिर-गुरुद्वारांसह १३ दान पेट्या सील केल्या. ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद होण्याअाधी दानपेट्यांत टाकलेले दान व त्यानंतर आठ दिवस केलेले दान याचा हिशेब सोमवारी धर्मादाय कार्यालयाच्या निरीक्षकांचे पथक तपासतील. त्यानंतर या दान पेटीत काळा पैसा टाकला याचा शोध
घेतला जाईल.
पाच निरीक्षकांनी शुक्रवारी ही कारवाई केली. मात्र या पेट्यांतील पैशांचे गाणित सरासरी पद्धतीने काढले जाणार आहे. ही कारवाई सकाळी अकरा वाजेपासून रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दुपारी ३ वाजता सुपारी हनुमान मंदिराची दानपेटी धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक राजेश गायकवाड व आशिष जतकर यांनी सील केली. मंदिराबाहेरील व आतील दोन्ही दानपेट्यांचा पंचनामा करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...