आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवेचा वेग वाढला; तापमानात एक अंशाने झाली घट, तीन दिवस ढगांचे आच्छादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ओक्ची चक्रीवादळामुळे औरंगाबादसह अनेक शहरांवर विरळ ढगाचे आच्छादन पसरले होते. शिवाय उत्तर, पश्चिमेकडून हवेचा ओघ वाढला होता. त्यामुळे दमट वातावरणाला चाप बसला. थंड वारे वाहत असल्याने नागरिकांना थंडीच्या लाटेपासून बचावासाठी गरम कपड्यांचा वापर करावा लागत आहे. 

 

शुक्रवारच्या तुलनेत किमान कमाल तापमानात एक अंशांनी घट होऊन ते १३.४ आणि २८.६ अंशांवर खाली आले होते. पुढील तीन दिवस हवेचा वेग, ढगाचे विरळ ते मध्यम स्वरूपाचे आच्छादन राहणार असून थंड, गरम वातावरण अनुभवावयास मिळेल. ढगांच्या आच्छादनामुळे दमट वातावरण राहते. मात्र, थंड हवेचा वेग वाढल्याने बोचरी थंडी जाणवू लागली आहे. वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. तूर, हरभरा आदी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. 

बातम्या आणखी आहेत...