आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा हजार नागरिकांचा पाणी प्रश्न सुटणार! नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची पाण्यासाठी ओरड होत आहे. महिला-मुलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे पाण्यासाठीची ओरड कमी करण्याच्या उद्देशाने समांतरने शहरात आठ ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. सुमारे दीड किमीची पाइपलाइन टाकली जाणार असून यामुळे किमान दहा हजार लोकांचा पाणीप्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. शहरात इतरही ठिकाणी पाइपलाइन दुरुस्ती, व्हॉल्व्ह दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे समांतरच्या सूत्रांनी सांगितले.

शहरातील ज्या भागातील नळांना दूषित पाणी येत असल्याची ओरड होत आहे, अशा ठिकाणी प्राधान्याने नवीन पाइपलाइन टाकण्याचे समांतरने हाती घेतले आहे. चार महिन्यांपूर्वी २०९ ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. आतापर्यंत ३० किमीपर्यंतची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. गारखेडा, शहागंज, संजयनगर जिन्सी, एन ६, एसटी कॉलनी, भावसिंगपुरा आदी भागांतील नागरिकांनी स्वच्छ मुबलक पाणी मिळण्यासाठी मनपाकडे वारंवार निवेदने दिली आहेत. या भागातील पाइपलाइनची कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली. या ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत. ही कामे पूर्ण होताच नवीन कामाला प्रारंभ झाला असून व्हॉल्व्ह टाकण्याची कामेही सुरू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही पाइपलाइनचे काम सुरू आहे. तसेच भाजीवालीबाई चौकातील (पीर बाजार) व्हॉल्व्हची दुरुस्ती शनिवारी रात्री करण्यात आली.

आझाद चौकात १८मीटरच्या १५० एमएमची पाइपलाइन टाकण्यासह व्हॉल्व्ह दुरुस्ती सुरू आहे.
हर्सूल२०मीटर १०० एमएमचे पाइप टाकले जात आहेत.
जयभवानीहौसिंग सोसायटीतीलस्वामी समर्थ मंदिराजवळ ६० मीटरच्या पाइपलाइनचे काम सुरू असून १५० एमएमचे पाइप टाकले जात आहेत.
संजयनगर १०० एमएमच्या पाइपलाइनचे काम सुरू आहे.
सिद्धेशनगरक्रांती चौक वॉर्डात२०० मीटरचे काम १५० एमएमचे पाइप टाकून करण्यात येत आहे.
वानखेडेनगरएन १३ मध्ये१५० एमएमची पाइपलाइन टाकण्यात येत असून ३०० मीटर काम करण्यात येणार आहे.
भाजीवालीबाई चौकातील व्हॉल्व्ह शनिवारीच बदलला.
चिकलठाणायेथीलपुष्पक गार्डन परिसरात २५० मीटरची नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी १५० एमएमचे पाइप वापरले जाणार आहेत.
मसनतपूरयेथेएसबीएच बँकेजवळ २५० एमएमचे पाइपचे ९९ मीटर तसेच २०० एमएमचे १६५ मीटर, १५० एमएमचे १६.५० मीटर पाइप टाकण्याचे काम सुरू आहे.

जेथे आवश्यकता तेथे काम
सध्याकंपनीतर्फे आलेल्या तक्रारी आणि प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या भागात नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम केले जात आहे. राहुलमोतीयळे, जनसंपर्कअधिकारी, औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कं.