आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्ड्यांच्या निविदेतही मनपाची कासवगती! शहरात दहा हजारांवर खड्डे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - शहरातील१५ लाख नागरिकांना खड्ड्यात टाकणाऱ्या रस्त्यांबाबत उद्या मंगळवारी (दि. 6 सप्टेंबर) मनपाची विशेष सर्वसाधारण सभा होत आहे. त्यात नगरसेवक फक्त गदारोळ करतात की पॅचवर्क डांबर प्लँटचा विषय तडीला नेऊन खड्ड्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, खड्डे बुजवण्याची निविदा प्रक्रिया कासवगतीने सुरू असल्याचे समोर आले आहे.

गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्त व्हावेत, अशी अपेक्षा होती. पण ३१ आॅगस्टची सभा आयुक्तांना घेरण्यातच आटोपली. त्यावर टीकेची झोड उठताच मंगळवारी रस्ते खड्ड्यांवर विशेष सर्वसाधारण सभा होत आहे.

विसर्जन मार्गांना प्राधान्य : गणरायाच्या आगमना आधी खड्डे बुजवावेत, अशी नागरिकांची अपेक्षा होती. परंतु प्रशासनाने प्रत्येकी पाच लाख रुपयांची सर्व प्रभागांत कामे सुरू करीत विसर्जन मार्गावर मुरुमाचे पॅचवर्क हाती घेतले आहे. सूतगिरणी ते शिवाजीनगर, रामनगर ते जयभवानीनगर मार्गे संतोषीमातानगर, चिश्तिया काॅलनी ते बजरंग चौक, एन-१२ परिसर या भागांतील कामे प्रगतिपथावर आहेत. मुख्य मिरवणूक संस्थान गणपती ते औरंगपुरा असते. त्या मार्गावरील कामांना मुहूर्त लागलेला नाही.

२४ कोटींच्या रस्त्यांप्रकरणी आज बैठक
शासनानेदिलेल्या २४ कोटी ३३ लाख रुपयांच्या निधीतून सुरू करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांसंदर्भात उद्या विभागीय आयुक्त डाॅ. उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. त्यात दोषींवर कारवाईचा निर्णय होईल. जिल्हाधिकारी डाॅ. निधी पांडे यांनी शहर अभियंत्यांवर ठपका ठेवला आहे.

निविदांना प्रतिसाद कमी
हायकोर्टाने११ ऑगस्ट रोजी खड्डे बुजवण्यास ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर प्रभागांतील खड्डे बुजवण्यासाठी जवळपास कोटी रुपयांची ३३ टेंडर्स काढण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन- तीन निविदा सोडल्या तर बाकीच्यांची प्रक्रिया सुरूच आहे. निविदांना कमी प्रतिसाद मिळाल्याने अद्याप एकही काम सुरू होऊ शकलेले नाही. त्यात पुन्हा प्रथम निविदेला ३० दिवस, नंतर फेरनिविदा झाल्यास १५ दिवस अशी मुदत असल्याने फेरनिविदा होणारी कामे लांबतच जाणार आहेत.

४८५१ खड्डे संपूर्ण शहरात
रस्त्यांचीयाचिका न्यायालयात गाजत असताना मनपाने जुलैअखेर सर्वेक्षण केले. त्यात सुमारे १०० मुख्य रस्त्यांवर ४८५१ खड्डे असल्याचे समोर आले. महिनाभरातील पावसामुळे १० हजारांवर खड्डे असतील, असे मनपा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

४२० चा गुन्हा नोंदवा : नगरसेवक विकास एडके यांनी विभागीय आयुक्तांना पत्र देत रस्त्यांचे काम करणाऱ्या ठेकेदाराने अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करून ठेकेदार, अधिकाऱ्यांवर ४२० चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
बातम्या आणखी आहेत...