आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टवाळखोरांमुळे शहरात तणाव, तीन हजार पोलिस बंदोबस्तासाठी रस्त्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील २० टवाळखोर तरुणांनी धुडगूस घातल्यामुळे शनिवारी तीन हजार पोलिस वेठीस धरले गेले. रमजान ईदच्या दिवशी या घटना घडल्या. पोलिस प्रशासनाने वेळीच दखल दिल्यामुळे वातावरण शांत झाले.

औरंगपुऱ्यात एस. बी. कॉलेजच्या समोर दुपारी अडीच वाजता दुचाकीवर आलेल्या तरुणांनी धिंगाणा घातला. त्यांनी चार टपऱ्या आणि हातगाड्या उलथवून टाकल्या. काही जणांना मारहाण केली. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता. ही घटना घडण्यापूर्वी सरस्वती भुवन काॅलेजच्या गेटसमोर काही तरुणांनी समीर खान कुरेशी (१८), मुझाहीर खान मियाँ कुरेशी (रा. सिल्लेखाना) या दोघांना मारहाण केली.

या दोघांनी सिल्लेखान्यातील फोनवरून १५ ते २० जणांना घटनास्थळी बोलावले. समीर आणि मुझाहीर यांना मारहाण करणाऱ्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत म्हणून या टोळक्याने चौकातील टपऱ्या आणि हातगाडीवाल्यांना मारहाण सुरू केली. त्यांच्या टपऱ्या उलथवून टाकल्या. झालेल्या दगडफेकीत अभिमन्यू चव्हाण, अमर ढेकळे, लक्ष्मीकांत दहीवाल, विष्णू ढगेळे हे जखमी झाले. क्रांती चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत तरुण पळून गेले होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटुळे, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, बाबाराव मुसळे, निरीक्षक नागनाथ कोडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

फुटेज तपासणार
शुक्रवारीपैठण गेट येथे झालेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जाईल. काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आहे. औरंगपुरा भागात या माथेफिरूंनी हैदोस घातला, त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत, असे पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांनी सांगितले.

दुचाकीस्वारास मारहाण
रवींद्रनाकटिळे (२८, रा. टीव्ही सेंटर) हे शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास एमजीएमकडून टीव्ही सेंटरकडे जात होते. सेंट्रल नाक्याजवळ रवींद्र यांच्या गाडीसमोर एमएच २० बीक्यू ५०८ क्रमांकाची चारचाकी उभी होती. रवींद्र यांनी मागून हॉर्न वाजवल्यामुळे या गाडीतील चार ते पाच युवकांनी त्याला मारहाण केली.

९०० पोलिस तैनात
शनिवारीशहराला छावणीचे स्वरूप आले होते. शहरात सुमारे ४० संवेदनशील ठिकाणी फिक्स पाँइट देण्यात आले होते. यात राज्य राखीव दलाच्या तीन, केंद्रीय राखीव दलाच्या तीन तुकड्या, मुख्यालयातील १६ गाड्या १२५ कर्मचारी, प्रत्येक पोलिस ठाण्याच्या अंतर्गत दोन फिक्स पाँइट, वाहतूक शाखेचे फिक्स पाँइट, १५० चार्ली, ३० पोलिस निरीक्षक, सहा सहायक आयुक्त, दोन उपायुक्त नियुक्त करण्यात आले आहेत.

अफवापसरवू नका
नागरिकांनीकुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. वातावरण शांत आहे. बंदोबस्त चोख आहे. झालेल्या दोन्ही घटना या रस्त्यावर झालेले वाद आहेत. या घटनांना धार्मिक पार्श्वभूमी नाही. राजकीय वर्गातूनदेखील पूर्ण सहकार्य आहे. पोलिसांशी संपर्क साधावा. अमितेशकुमार, पोलिसआयुक्त
बातम्या आणखी आहेत...