आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत झळकले दहशतवाद्यांचे पोस्टर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - देशभरात झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टर माइंड असलेल्या यासीन भटकळसह इतर तिघांना पकडण्यासाठी पोलिसांनी दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले. मात्र, जनतेच्या मदतीशिवाय यांना पकडणे शक्य नसल्याने बुधवारपासून एटीएसच्या जवानांनी शहरातील थिएटरसह गर्दीच्या ठिकाणी पोस्टर लावण्यास सुरुवात केली आहे.
इंडियन मुजाहिदीनचा प्रमुख असलेल्या यासीन भटकळने उच्च शिक्षण घेणा-या मुलांना दहशतवादाचे प्रशिक्षण देऊन
देशभर बॉम्बस्फोट घडवल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

मुंबई व पुण्यातील जंगली महाराज रोडवर झालेल्या स्फोटाचा तपास करणा-या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारिया यांनी यासीन भटकळ, तहसीन अख्तर वसीम अख्तर, असदुल्ला अख्तर जावेद अख्तर आणि वकीस ऊर्फ अहेमद यांना पकडण्यासाठी दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले. या अनुषंगाने त्यांची माहिती दर्शविणारी पत्रके मंगळवारी (दि. 12) औरंगाबाद एटीएस कार्यालयात आली. बुधवारपासून (दि. 13) संपूर्ण महाराष्ट्रभर पोस्टर लावण्याची मोहीम सुरू करण्यात आली. सकाळपासून बसस्थानक, रेल्वेस्टेशन आणि शहरातील सर्व थिएटरमध्ये पोस्टर लावण्याचे काम एटीएसच्या पथकाने सुरू केले.

यासंदर्भात पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले की, देशभर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये यासीन भटकळचा हात असून त्याच्या साथीदारांची माहिती देणा-या ची माहिती गुप्त ठेवली जाणार आहे. राज्यात सर्व ठिकाणी हे पोस्टर लावण्याचे काम सुरू झाले असून त्याचाच एक भाग म्हणून आज शहरात ही मोहीम राबवण्यात आल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले.