आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फरार अतिरेक्यांच्या शोधासाठी औरंगाबादेत पोस्टर्स; एटीएसची मोहीम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- देशात दहशत पसरवणार्‍या इंडियन मुजाहिद्दीनच्या दोन फरार अतिरेक्यांना शोधासाठी एटीएसने शहरात अतिरेक्यांचे पोस्टर्स जारी केले आहेत. सहा महिन्यांपूर्वी अशीच मोहीम राबवल्यानंतर असद अली आणि यासीन भटकळ हाती लागल्याचा एटीएसचा दावा आहे.

तहसीन अख्तर शेख ऊर्फ मोनू आणि वकास ऊर्फ अहेमद यांच्या शोधासाठी मॉल, रेल्वेस्टेशन, बसस्थानक, चित्रपटगृह, विमानतळ आदी सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. तीन दिवसांपासून एटीएसचे कर्मचारी शहरात पोस्टर्स लावत आहेत. भटकळ हाती लागल्यानंतर काही अतिरेकी संघटना सक्रिय झाल्याची माहिती गुप्तचर विभागाकडे आहे. तसेच त्यांच्याकडून घातपात होण्याची शक्यता असल्याने एटीएसने हे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रात एटीएस अधिक सक्रिय झाले आहे. दोन अतिरेक्यांचे पोस्टर लावण्याचे काम आम्ही वरिष्ठांच्या आदेशावरून सुरू केले आहे. गरजेनुसार पोस्टर छापून ते गर्दीच्या ठिकाणी लावण्यात येत असल्याचे एटीएसचे पोलिस उपनिरीक्षक गोरख जाधव यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.