आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएडच्या टीईटीत विचारले बीएडचे प्रश्न, पुन्हा परीक्षा घ्या, नसता न्यायालयात धाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्रराज्य परिषदेने िशक्षक पात्रतेसाठी रविवारी राज्यात घेतलेल्या टीईटी परीक्षेमध्ये उर्दू माध्यमाच्याविद्यार्थ्यांना हस्तलिखित प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. त्यामध्येही खाडातोड होती, तसेच उत्तरासाठी देण्यात आलेले दोन, तर काही ठिकाणी चारही पर्याय सारखेच होते. इतकेच नाही, तर डीएडच्या प्रश्नपत्रिकेत बीएडचे प्रश्नविचारण्यात आल्याचा आरोप काही उमेदवारांनी केला आहे. टीईटीची परीक्षा राज्यात तीन लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी दिली. यामध्ये जवळपास उर्दू माध्यमाचे ७५ हजार परीक्षार्थी होते.
प्रश्नक्रमांकांत बदल : प्रश्नपत्रिकेतप्रश्नासमोर दोन प्रकारचे क्रमांक देण्यात आले, त्यामध्ये छापील आणि हस्तलिखितमध्ये वेगवेगळे क्रमांक देण्यात आले होते.

परिसरपेपरमध्ये इतिहासाचे प्रश्न : परिसरअभ्यास या विषयाच्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक १३८ ते १५० क्रमांकापर्यंत इतिहास नागरिक शास्त्राचे प्रश्नविचारण्यात आले होते.
डीएडलाकाही प्रश्न बीएडचे : बालमानसशास्त्रअध्यापन शास्त्राऐवजी मानसशास्त्राचे प्रश्नविचारण्यात आले. विशेष म्हणजे बीएडचे प्रश्न डीएडच्या पेपरमध्ये विचारण्यात आले.
- चुकीच्या प्रश्नांमुळे आणि खाडाखोडीमुळे आम्हाला प्रश्न समजले नाहीत. छापील प्रश्नपत्रिका देऊन पुन्हा परीक्षा घेण्यात यावी. शोएबअरसलान, विद्यार्थी
- आम्ही मेहनत करूनसुद्धा अशा प्रकारे परीक्षा होत असेल तर ते चुकीचेच आहे. शासनाने पुन्हा परीक्षा घ्यावी. आम्हाला न्याय द्यावा. मोहंमदशोएब, विद्यार्थी
पुन्हा परीक्षा घ्यावी
- शासनानेशुल्क घेता पुन्हा परीक्षा घ्यावी. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू तसेच गरज भासल्यास न्यायालयात जाणार आहे. इलहाजोद्दीनफारुकी, अध्यक्ष,अखिल भारतीय उर्दू िशक्षक संघटना