आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठक्कर हत्येप्रकरणी पोलिस संभ्रमात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सराफा व्यापारी शैलेश ठक्कर यांच्या हत्येचा पोलिसांना अद्याप तरी काहीही सुगावा लागलेला नाही. मात्र, त्यांच्यावर पाळत ठेवूनच त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय नेवासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास फुंदकर यांनी व्यक्त केला. दरम्यान, पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी ठक्कर बेपत्ता झाल्याची तक्रार वैजापूरला नोंदवण्याऐवजी शहरातील ठाण्यात का नोंदविण्यात आली नाही असा प्रश्न शुक्रवारी उपस्थित केला. यामुळे प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

ठक्कर यांच्या हत्येचे प्रकरण आता तीन पोलिस ठाण्याअंतर्गत आहे. नाशिक ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उंदीरवाडीजवळ ठक्कर यांची हत्या झाल्याचा संशय आहे. तर तेथून त्यांचा मृतदेह कायगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात पोत्यात बांधून फेकण्यात आला आहे. यामुळे अनेक शंका उपस्थित होत आहेत. उंदीरवाडीत पारधी वस्ती असून, तेथे लुटमारीचे प्रकार घडतात. मात्र ज्या उंदीरवाडीत ठक्कर यांच्याकडून पैसे हिसकावत जिवे मारून त्यांचा मृतदेह नदीच्या पात्रात फेकणे असा प्रकार पारधी समाजाकडून होत नाही, पण आम्ही सर्व बाबी तपासत असल्याचे फुंदकर म्हणाले. सराफा व्यापारी बेपत्ता होतो आणि त्याची साधी माहितीही शहर पोलिसांना दिली जात नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. एरवी शहरात काहीही घडले की व्यापारी पोलिसांकडे धाव घेत तक्रार देतात. या प्रकरणात ठक्कर यांच्या निकटवर्तीयांचा हात असू शकतो असा संशय असून, याची माहिती घेण्यात येत आल्याचे पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी सांगितले.