आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठकसेन गांधीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शासकीय पुरवठादार असल्याची बतावणी करून व्यापाºयांना पावणेदोन कोटीला चुना लावणारा ठकसेन प्रवीण चंपालाल गांधी याच्याविरुद्ध अखेर सोमवारी रात्री उशिरा मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दैनिक ‘दिव्य मराठी’ने या ठकसेनाचा 11 जानेवारी रोजी पर्दाफाश केला होता. या वृत्तामुळे शहरात खळबळ उडाली होती.
गुजरात येथील 65 वर्षीय ठकसेन प्रवीण गांधी याने शहरातील 10 व्यापाºयांची फसवणूक केल्याची माहिती उजेडात आली; मात्र यातील चार तक्रारदारच पोलिसांसमोर आले आहेत. ‘दिव्य मराठी’च्या वृत्ताची दखल घेत पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली होती. गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी गांधी याने थाटलेल्या कार्यालयाची झडती घेऊन काही कागदपत्रे हस्तगत केली आहेत. त्याच्या बँक खात्याचा तपशीलही मागवला आहे.