आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • थॅलेसेमियाग्रस्त मयूरीने दिली

थॅलेसेमियाग्रस्त मयूरीने दिली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सव्वादोन महिन्यांपासून थॅलेसेमियासारख्या दुर्धर आजाराशी लढा देणार्‍या १६ वर्षांच्या मयूरी जाधवने गुरुवारी वैद्यकीय पूर्वपरीक्षा दिली. माझे आयुष्य किती आहे हे माहिती नाही; पण माझ्यातील सकारात्मकता, ऊर्जा इतरांसाठी प्रेरणा ठरावी यासाठी डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन मी वाटचाल करत असल्याचे भावुक उद््गार तिने काढले. दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर अशक्य काही नाही, हे मयूरीच्या आत्मविश्वासपूर्ण बोलण्यातून जाणवत होते.

अशोक आणि मीना जाधव यांना ११ जून १९९८ ला पहिले अपत्य झाले; पण अवघ्या सव्वादोन महिन्यांतच तिला थॅलेसेमिया झाल्याचे निष्पन्न झाले. नशिबाला दोष देण्यापेक्षा जाधव दांपत्याने उपचाराला सुरुवात केली. सुरुवातीपासून जाधव दांपत्य सकारात्मक राहिल्याने मयूरीच्या मनाला कधीही नकारात्मक विचार शिवलाही नाही. भविष्यात डॉक्टर होऊन थॅलेसेमिया पीडितांना आधार देण्याचा मयूरीचा मानस आहे. शहरातील थॅलेसेमिया झालेल्या रुग्णांची वयोमर्यादा २२ वर्षांपर्यंत आहे. मात्र, योग्य उपचार मिळाल्यास आयुष्य वाढू शकते. बहुतांशी रुग्ण दहाव्या वर्षापर्यंत जगाचा निरोप घेतात.

हुशार, मनमिळाऊ
मयूरी शिशू विहार शाळेची विद्यार्थिनी आहे. तिला कायम ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असतात. ती अभ्यासात हुशार मनमिळाऊ असल्याने प्रत्येकाची लाडकी आहे. बारावी सायन्सची परीक्षा तिने नुकतीच दिली.

काय आहे थॅलेसेमिया?
थॅलेसेमियाहा आनुवंशिक गुणसूत्रांचा आजार आहे. यात शरीरातील हिमोग्लाेबिन कमी होत असते. आरबीसी (रेड ब्लड सेल) मधून ऑक्सिजनचा पुरवठा संपूर्ण शरीरात होत असतो. मात्र, अशा रुग्णांमध्ये आरबीसी कमी असल्याने ऑक्सिजन पुरवठा होत नाही. त्यामुळे दम लागणे, धडधड हाेणे आणि श्वसनाला त्रास होणे अशी लक्षणे दिसू लागतात. आरबीसीचे आयुष्य सामान्य व्यक्तीमध्ये १२० दिवस आहे; पण या रुग्णांमध्ये या पेशी बाहेरून देऊन शरीरात ऑक्सिजन पुरवठा पूर्ण केला जातो. बोनमॅरो किंवा स्टेमसेल्स हा उपचार यामध्ये आहे. यासाठी रुग्णाला महिने रुग्णालयात राहावे लागते. यासाठी १८ ते २० लाखांपर्यंत खर्च येतो. -डॉ. महेंद्रसिंग चौहान, दत्ताजी भाले रक्तपेढी