आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: वर्धन हत्येचे ठाणे कनेक्शन, पोलिसांनी वडिलांच्या खुनाची फाइल मागवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२२ फेब्रुवारी २०१० रोजी कळवा येथे वर्धनचे वडील विवेक घोडे यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. २७ फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या सहा वर्षांनंतर वर्धनचा २८ फेब्रुवारीला निर्घृणपणे खून करण्यात आला. - Divya Marathi
२२ फेब्रुवारी २०१० रोजी कळवा येथे वर्धनचे वडील विवेक घोडे यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. २७ फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या सहा वर्षांनंतर वर्धनचा २८ फेब्रुवारीला निर्घृणपणे खून करण्यात आला.
आैरंगाबाद- दहा वर्षीय वर्धनच्या खून प्रकरणात पोलिसांचा तपास आता ठाणे कनेक्शनच्या दिशेने फिरला आहे. जवाहरनगर पोलिसांनी गुरुवारी ठाण्यातील कळवा पोलिसांशी पत्रव्यवहार करून वर्धनच्या वडिलांच्या खुनाची फाईल मागवली आहे. त्याच्या वडिलांच्या खुनाचा वर्धनच्या खुनाचा काही संबंध आहे का, या दिशेने तपास केला जात आहे. 

वर्धनचा खून करणारे अभिलाष ऊर्फ अभिराज मोहनपूरकर आणि श्याम मगरे पोलिस कोठडीत आहेत. बुधवारी पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर उपनिरीक्षक काशीनाथ महांडुळे यांच्या पथकाने आरोपींनी वर्धनला नेलेली ठिकाणे तसेच संपूर्ण मार्गाची पाहणी केली होती. यात त्यांनी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले. तिसऱ्या अारोपीच्या मागासाठी गुरुवारी या संपूर्ण सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.

२२ फेब्रुवारी २०१० रोजी कळवा येथे वर्धनचे वडील विवेक घोडे यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. २७ फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या सहा वर्षांनंतर वर्धनचा २८ फेब्रुवारीला निर्घृणपणे खून करण्यात आला. त्यामुळे वडिलांच्या खुनाच्या मारेकऱ्यांचा वर्धनच्या मारेकऱ्यांचा काही संबंध तर नाही ना, या दृष्टीने तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, वर्धनचे वडील विवेक घोडे यांच्या खूनप्रकरणी वर्षे कळवा पोलिसांनी तपास केला. परंतु त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी तपास थांबवला. या सर्व घटनाक्रमांच्या पार्श्वभूमीवर ठाणे कनेक्शनच्या अनुषंगाने औरंगाबाद पोलिसांनी तपास सुरू केला. 

श्याम मगर, ठाणे कनेक्शन
वर्धनचा खून करणारा श्याम मगरे याचे काही जवळचे नातेवाइक ठाण्यात वास्तव्यास आहेत. सुरुवातीपासून मगरे याने अभिराजच्या सांगण्यावरुन मी हे कृत्य केल्याचे सांगत आहे. त्यानंतर मगरे याचे ठाणे कनेक्शन समाेर आल्याने त्या दिशेने तपास सुरू आहे. तसेच अभिराज श्याम यांनी गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या कॉल्सची माहिती पोलिसांनी मागवली असून त्या आधारे सुगावा लागतो का, याची पडताळणी केली जात आहे. 

आजोबांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 
पोलिसांच्या तपासासंदर्भात आम्ही समाधानी आहोत. पोलिसांचे आम्हाला योग्य ते सहकार्य मिळत असून यातील सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून वर्धनला न्याय द्या, अशी भावना वर्धनच्या कुटुंबियांनी व्यक्त केली. वर्धनचे आजोबा यशवंत पुजारी यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्धनच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. 
 
पुढील स्लाइडवर पाहा वर्धन घोडेच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी वर्धनचे आजोबा पुजारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भेट घेऊन निवेदन सादर केले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...