आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: थापा म्हणाला, पैसे ठेवा, शहर सोडा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सेंट्रलनाका परिसरातून राजेश ठक्करकडून जुन्या चलनातील हजार, पाचशेच्या एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा लुटणाऱ्या लुटारूंशी संपर्क साधून जमादार वीरबहादूर ऊर्फ थापा कुलबहादूर गुरुंग याने ते पैसे स्वत:कडे ठेवून घेत लुटारूंना औरंगाबाद सोडून जाण्यास सांगितले होते, असे गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे. यात काही पोलिस कर्मचाऱ्यांसह राजकीय नेत्यांच्या नातेवाइकांचा समावेश असल्याची चर्चा आहे.
 
कुरिअर व्यावसायिक हितेश पुजारा याच्या जुन्या चलनातील हजार पाचशच्या नोटा बदलून देण्याची थाप मारून जमील खान, फजल खान, शेख सद्दाम, साजीद अब्दुल आणि योगेश शेट्टे यांनी एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा २१ फेब्रुवारी रोजी सेंट्रल नाका येथून लुटल्या. जमीलने ही रक्कम साजीदच्या नारेगावातील घरात ठेवली. २२ फेब्रुवारीला थापाने जमीलशी संपर्क साधून ही रक्कम माझ्याकडे जमा करा, असे सांगितल्यानंतर जमीलने ही रक्कम थापाला सलीम स्टेफनीच्या समक्ष दिली. थापाने ती स्कॉर्पिओ गाडीत ठेवून जमील फजलला सोडण्यास सांगितले. ते दोघेही मालेगावला गेले होते. 

घटनेनंतर ठक्कर आपल्याविरोधात तक्रार देतील, असा संशय आल्याने जमीलला साडेनऊ लाखांसह पकडून देण्याचे षडयंत्र रचण्यात आले. चकलांबा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर यांना जुन्या हजार पाचशेच्या नोटांसह जमील खान कारने शेवगावहून गेवराईकडे जाणार आहे, अशी माहिती दिली होती. त्यानुसार २५ फेब्रुवारी तेजनकर यांनी जमीलला पकडले. परंतु, प्रकरण गंभीर असल्याने तेजनकरांकडून तपास काढून तो प्रोबेशनरी उपअधीक्षक राजकुमार चाफेकर यांच्याकडे देण्यात आला. चाफेकरांनी प्रकरणाचा छडा लावला. दरम्यान योगेश गजानन शेटे आणि थापा यास आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. यू. सुपेकर यांच्या समोर हजर करण्यात आले असता सरकारी वकील एम. ए. गंडले यांच्या युक्तिवादावरून दोघांना ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

एक कोटी कोठून आले? 
पुजाराकडेएका कोटी रुपये कोठून आले, याबाबत आयकर विभागाडून चौकशी होऊ शकते. यातील सर्व पुरावे बारकाईने तपासले जातील, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...