आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • That All Student Eligiable To Appear The Examination ; Ranendra Darda

‘ते’ सर्व विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र दोषी महाविद्यालयांवर कारवाई : राजेंद्र दर्डा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दहावीत 40 टक्क्यांहून कमी गुण असतानाही अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना बोर्डाने अपात्र ठरवले असले तरी त्यांना यंदा परीक्षेला बसण्याची मुभा देण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचेही ते म्हणाले. मात्र, विद्यार्थ्यांना नियमबाह्य प्रवेश देणा-या महाविद्यालयांवर कारवाई करून फक्त चालू शैक्षणिक वर्षापुरतीच ही मुभा असल्याचेही त्यांनी सांगितले.
दर्डा तसेच शिक्षण उपसंचालक, बोर्डाचे चेअरमन यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोषी महाविद्यालयांची चौकशी करून आठवड्यात अहवाल देण्यास उपसंचालकांना सांगण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?
महाराष्‍ट्र राज्य माध्यमिक व उच्च् माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेत 1800 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेस अपात्र ठरवले होते. बोर्डाच्या नियमानुसार 40 टक्क्यांपेक्षा कमी गुण असणा-या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश देता येत नाही. काही महाविद्यालयांनी असे प्रवेश दिले होते. प्रकार उघडकीस येताच बोर्डाने सर्वच विद्यार्थ्यांना अपात्र ठरवले.