आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • That Boy Search Mission Continue, Confession Registered Mother Father

‘त्या’ मुलाच्या मागावर दोन पथके, शुभम हत्याप्रकरणी आई-वडिलांसह घरमालकाचाही जबाब नोंदवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अभ्यास करत नसल्याची तक्रार पालकांकडे केल्याचा राग धरून मावसभाऊ शुभम बारोटे याचा गळा आवळून खून करणा-या विधिसंघर्षग्रस्त मुलाच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. घटनेचा तपास करणारे पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी मंगळवारी शुभमच्या आई-वडिलांसह इतर काही जणांचे जबाब नोंदवले आहेत.
शेलूद येथील (जि. जालना) शुभम देवगिरी कॉलेजात शिकत होता. नात्याने मावसभाऊ असलेल्या 17 वर्षीय मुलाने रविवारी पहाटे त्याचा खून केला. तेव्हापासून तो बेपत्ता आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चौघांचे पथक त्याचा शोध घेत आहे. जवाहरनगर ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश ढोकरट यांचे स्वतंत्र पथक रवाना झाल्याची माहिती आहे. जवाहरनगर पोलिसांनी शुभमच्या मित्रांसह घरमालक दिगंबर काथार, खानावळ चालक आणि कोचिंग क्लासेसच्या काही जणांचे जबाब नोंदवले.