आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी गेलेली सात मंगळसूत्रे परत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- चोरट्यांकडून जप्त केलेले सोन्याचे दागिने, दुचाकी असा 50 लाखांचा ऐवज शहर पोलिसांनी सोमवारी नागरिकांना परत केला. यात सिडको पोलिस ठाण्याने सर्वाधिक सहा तर परिमंडळ एकमधून चोरीस गेलेले एक अशी एकूण सात मंगळसूत्रे महिलांना परत करण्यात आली.

पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्या आदेशान्वये शहरातील सर्व तेरा पोलिस ठाण्यांमध्ये जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयाच्या परवानगीने नागरिकांना परत करण्यात आला. पोलिस उपायुक्त डॉ. जय जाधव यांच्या परिमंडळ-1 मधील सर्व ठाण्यांमधून एकूण 37 लाखांचा मुद्देमाल परत करण्यात आला. त्यामध्ये एका महिलेचे मंगळसूत्र परत केल्याचे सहायक पोलिस आयुक्त नरेश मेघराजानी यांनी सांगितले. सर्वाधिक सहा मंगळसूत्रे सिडको ठाण्याचे निरीक्षक शिवा ठाकरे यांनी परत केली. अलका शिंदे, सरोज लोया, ई. बी. सूर्यवंशी, फिलिक्स वालिया, एम. बी. गुळवे आणि कुंदा मधुकर नीळ यांचे मंगळसूत्र परत करण्यात आले. पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया, सहायक पोलिस आयुक्त विजय पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस नाईक प्रकाश काळे आणि ए.पी. कुलकर्णी यांनी मुद्देमाल परत केला. मागील दोन वर्षांमध्ये शहरातील सात महिलांची मंगळसूत्रे हिसकावण्यात आली होती.