आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिकलठाण्यातील 40 वर्षे जुनी वोक्हार्ट कंपनी बंद, 54 कामगारांच्या बदलीची नोटीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील नावाजलेल्या आणि चाळीस वर्षे जुन्या वोक्हार्ट कंपनीला सोमवारी (२७ नोव्हेंबर) सकाळी सहा वाजता कंपनी व्यवस्थापनाने अचानक टाळे लावले. अमेरिकी औषधी प्रशासनाने वोक्हार्टच्या औषधींवर निर्बंध लादले. परिणामी कंपनीने उत्पादन थांबवले. म्हणून हे टाळे लागल्याचे सांगण्यात आले. 

 

पहिल्या शिफ्टला गेलेल्यांना याची पुसटशीही कल्पना नव्हती. त्यांना आत जाण्यास मज्जाव करत ५४ कामगारांची बदली केल्याची नोटीस गेटवर लावण्यात आल्याचे दाखवण्यात आले. यातील १८ जणांची हिमाचल प्रदेश येथे तर ३६ जणांची कंपनीच्या औरंगाबादेतील इतर प्रकल्पात बदली करण्यात आली आहे. कामगार उपायुक्तांनी हा प्रकार कामगार कायद्याच्या विरोधात असल्याचे सांगितले. तर व्यवस्थापनाने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. 


कामगार उपायुक्तांकडे झाल्या आठ बैठका : कंपनीतील५४ कामगारांत ३७ पुरुष १७ महिला आहेत. पुरुष मशीन ऑपरेटर तर महिला औषधींचे पॅकिंग करतात. सर्वांना सरासरी ३० वर्षांचा अनुभव आहे. काही महिला रुपये रोजाने कामाला लागलेल्या आहेत. त्यांना ३९ वर्षे पूर्ण झाली. कामगारांच्या म्हणण्यानुसार कंपनीच्या कार्यकाळात १७ हजार इतका सर्वाधिक पगार आहे. १९९६ पर्यंत भारतीय मजदूर संघाची युनियन होती. मात्र कंपनीच्या मध्यस्थीने ती बरखास्त झाली. तेव्हापासून अंतर्गत युनियन आहे. हजार रुपये पगारवाढीसाठी आम्ही कंपनीसह कामगार उपायुक्तांना निवेदन दिले. आजवर आठ बैठका झाल्या. मात्र कंपनीने पगारवाढ केली नाही. आता जबरदस्तीने बदल्या केल्या. १७ महिला कामगारांची नोकरी सरासरी ३५ वर्षांची आहे. औरंगाबादला दुसऱ्या प्रकल्पात काम केल्यास आमची सेवाज्येष्ठता कमी होईल पगारवाढीच्या मुद्द्याला बगल मिळेल. ज्यांची बदली हिमाचल प्रदेशात केली ते इतके लांब जाणार नाहीत. गेले तर कंटाळून नोकरी सोडून देतील, असा व्यवस्थापनाचा डाव असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. 

 

कामगार संघटनेने दिले व्यवस्थापनास पत्र 
सर्वकामगार वोक्हार्ट एम्प्लॉइज युनियनचे सभासद अाहेत. जानेवारी २०१३ ते ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत करार झाला होता, तो आता संपलेला आहे. नोव्हेंबर २०१६ ला संघटनेने पगारवाढीची मागणी करणारे पत्र व्यवस्थापनास दिले. औद्योगिक न्यायालयात दाद मागितली आहे. सोमवारी सकाळी कंपनीला टाळे लागलेले पाहून कामगारांनी तत्काळ व्यवस्थापनाला पत्र लिहिले. यात म्हटले आहे की, आमच्या बदलीची नोटीस २४ नोव्हेंबरची आहे. २५ २६ रोजी कंपनीला सुटी होती. त्यामुळे आम्हाला गेटवर नोटीस मिळाली. सकाळी ७.३० वाजता कामावर आलो, पण ५४ कामगारांची इतरत्र बदली केल्याची नोटीस इंग्रजी भाषेत लावली. कायदेशीर अधिकारास कोणतीही बाधा आणता बदली आदेश रद्द करावेत कामावर रुजू करून घ्यावे, अशी विनंती या पत्रात कामगारांनी केली आहे. 


चिकलठाण्यात १९७७ मध्ये सुरू झाली कंपनी 
चिकलठाण्यात१९७७ मध्ये एल-१ वोक्हार्ट नावाने कंपनी सुरू झाली. तेेथे अॅमिट्रसिलीन, फॉमिलो फ्रूस, ग्लोबिन, फ्लेमाईन, अॅझिथ्रोमायसिन आदी २५ ड्रग औषधी तयार होत होते. १९९४ मध्ये अमेरिकेतील यूएसएफडीएचा परवाना मिळवलेली ही भारतातील एकमेव ठरली. येथील ६० टक्के उत्पादन अमेरिका इंग्लंडमध्ये निर्यात होत होते. मात्र, चार वर्षांपूर्वी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने काही निर्बंध लादल्याने कंपनीला आर्थिक फटका बसला. सध्या कंपनी इंग्लंडसह भारतात लागणारी ३० ते ३५ टक्के औषधी बनवते. 

 

कामगारांचा छळ 
कामगारांच्या मेहनतीमुळेच कंपनीने देशात १३ कारखाने उभारले. अचानक आमच्या बदल्या करून कंपनीने कामगारांचा छळ सुरू केला आहे. कंपनीत ३९ वर्षे काम केल्यानंतर अचानक मज्जाव केल्याने दु:ख झाले. 
- जे.व्ही. सिद्दिकी, अध्यक्ष, वोक्हार्ट एम्प्लॉइज युनियन 

 

भूमिका चुकीची 
मी मुंबईला असून माझ्याकडे औरंगाबाद कामगार उपायुक्त कार्यालयाचा अतिरिक्त पदभार आहे. वोक्हार्टमध्ये जे सुरू आहे त्याची कल्पना नाही. या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल. प्रथमदर्शनी कंपनी व्यवस्थापनाची चूक दिसते. आमच्या कार्यालयास कोणतीही सूचना देता कंपनी बंद करणे कामगार कायद्यानुसार चुकीचे आहे. 
- शैलेंद्र पोळ, कामगार उपायुक्त, मुंबई 

 

कोठे झाली बदली? 
५४पैकी २० कामगारांची बदली शेंद्रा येथे, कामगार बायोटेक एपीआय औरंगाबाद, कामगारांची फॉर्म्युलेशन -२ बायोटेक पार्क औरंगाबाद येथे तर १८ कामगारांच्या बदल्या हिमाचल प्रदेशातील बद्दी येथे करण्यात आल्या आहेत. औरंगाबादच्या कारखान्यात २७ रोजी तर हिमाचल प्रदेशातील कारखान्यात २९ नोव्हेंबर रोजी हजर होण्याचे आदेश नोटिसीत देण्यात आले आहेत. 

 

प्रतिक्रिया देण्यास व्यवस्थापनाचा नकार 
कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाचे (एचआर) व्यवस्थापक अभिजित जैन यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. नंतर मेसेज केल्यानंतर उत्तर दिले. त्यात लिहिले होते की, मी व्यवस्थापनाच्या बैठकीत आहे. सध्या बोलू शकत नाही. 

बातम्या आणखी आहेत...