आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्ध व सैन्याविषयीचा आदर यांचा संबंध नाही : कॅ. बाणासिंग यांनी खोडले संरक्षणमंत्र्यांचे विधान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद -युद्ध झाले तरच सैनिकांबद्दल देशवासीयांच्या मनात आदर राहतो, अन्यथा तो कमी होत जातो या संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विधानाचे परमवीरचक्र विजेते कॅप्टन बाणासिंग यांनी खंडन केले. देशवासीयांच्या आदर आणि विश्वासाच्या बळावरच भारतीय सैन्य आजही सीमेवर यशस्वी कामगिरी करते आहे, असे ते म्हणाले

एका कार्यक्रमानिमित्त औरंगाबाद शहरात आलेल्या बाणासिंग यांनी बुधवारी ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला सदिच्छा भेट िदली. त्या वेळी चर्चा करताना त्यांनी संरक्षणमंत्र्यांच्या विधानाशी असहमती व्यक्त केली. पाकिस्तानच्या धमक्या, काश्मीर प्रश्न आणि पाकिस्तानी सैनिकांशी लढताना केलेली कामगिरी यावरही ते बोलले.
बाणासिंग यांच्या पराक्रमाबद्दल त्यांना १९८७ मध्ये भारत सरकारने परमवीरचक्र हा किताब दिला आहे. आठव्या जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फन्ट्री रेजिमेंटमध्ये नायब
सुभेदार असलेल्या बाणासिंग यांनी पाकिस्तानच्या कायदेआझम पोस्टवर कब्जा केला. या शौर्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
पाकच्या धमक्या पोकळ
पािकस्तानकडून येणारे इशारे आणि छुप्या कारवायांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बाणासिंग म्हणाले की, ज्यांच्या घरात खायला काही नाही ते दुसऱ्यांवर काय हल्ला करतील? त्यांना त्यांचे घर सांभाळता येत नाही. भारत दया दाखवत असल्यानेच पािकस्तान आतापर्यंत शिल्लक तरी आहे. म्यानमारसारखी कृती अनेक वेळा सैन्याकडून केली जाते, परंतु सैन्य कधीच त्याची शेखी मिरवत नाही, असेही ते म्हणाले.

वन रँक वन पेन्शनचा निर्णय शक्य
अनेक वर्षांपासून लटकलेली "वन रँक वन पेन्शन' योजनेची लवकरच अंमलबजावणी होईल. त्यातील त्रूटी दूर करण्याचे काम सुरू आहे. सरकारने निर्णय घेतला आहे. थोडा उशीर लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...