आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशासाठी खेळणाऱ्या मुलाला पाहण्यासाठी ऑटोरिक्षाचालक वडिलांनी केली 50 हजारांची उसनवारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - येत्या शुक्रवारपासून फिफाच्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात कोल्हापूरचा १७ वर्षीय अनिकेत जाधव भारताकडून खेळत आहे. मैदानावर लेकाचा पराक्रम पाहण्यासाठी वडील अनिल व अाई कार्तिकी यांच्यासह कुटुंबिय दिल्लीची वारी करणार अाहे. त्यांना यासाठी ५० हजारांची उसनवारी करावी लागली. स्पर्धेत भारताचा सलामी सामना दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हाेणार अाहे.
 
मित्रांच्या मदतीने पैशाची तजवीज, मात्र मुक्कामाची सोय नाहीच
अाॅटाेरिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारे अनिल जाधव म्हणाले, दिल्ली गाठण्यासाठी माेठ्या रकमेची जाेड करावी लागणार हाेती. काही मित्रांच्या मदतीने पैशाची नड दूर झाली. दिल्लीत ३-३ दिवसांच्या फरकाने भारताचे तीन सामने हाेतील. ते पाहण्यासाठी जाधव कुटुंबीयांना दाेन अाठवड्यांचा मुक्काम दिल्लीत करावा लागेल.  मात्र त्याची तजवीज अजूनही झालेली नाही. 
 
 
मुलाने नाव कमावले   
प्रचंड मेहनतीने अनिकेतने  स्वप्न साकारले. अाम्ही केवळ प्रयत्नांना प्राेत्साहन देऊ शकलाे. मात्र, हीच मेहनत फळाला अाली. यातून त्याने अामचेही नाव उंचावले. त्याचे हे यश अामच्यासाठी अभिमानास्पद अाहे.  
 -अनिल जाधव, अनिकेतचे वडील
 
५ जण रेल्वेने दिल्लीला
दिल्लीला सामना पाहण्याठी अनिकेतचे वडील अनिल, अाई कार्तिकी, बहीण काजल, अात्या अाणि मामा विलास जाधव जातील. यासाठी जाताना अाम्हाला ४ हजारांचा खर्च अाल्याचे अनिल जाधव सांगतात.
 
बातम्या आणखी आहेत...