आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोकेश्वर स्टेट अर्बन बँकेने खातेदार, कर्मचाऱ्यांना ठगवले; खातेदार, कर्मचाऱ्यांची पोलिसात धाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड- कन्नड येथील समर्थनगर भागात असलेल्या ढोकेश्वर मल्टिस्टेट अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड लासलगाव या बँकेतील खातेदारांनी ठेवलेली ठेव आणि सेव्हिंग रक्कम खातेदारांना मिळत नसल्याने सर्व ग्राहकांचे धाबे दणाणले आहे. तर बँकेने येथे शाखा सुरू करतेवेळी नोकरीला घेतलेल्या कर्मचाऱ्यांकडून १५ जणांकडून प्रत्येकी एक-एक लाख रुपये एफडी करून घेतले. आज रोजी तेही परत देण्यासाठी बँकेने दिलेले धनादेश वटत नसल्याने अखेर कर्मचारी व खातेदारांनी थेट कन्नड ठाण्यात धाव घेतली. ठेव आणि सेव्हिंग मिळून तब्बल ४४ लाख रुपयांची रक्कम असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या  विरोधात  पोलिसात धाव घेतली असता पोलिसांनी त्यांना न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे.  

एकूणच सर्व प्रकाराने खातेदार हवालदिल आहेत. बँकेचे मुख्य कार्यालय लासलगाव जि. नाशिक येथे असून या बँकेने कन्नड शाखेतील सुमारे पाचशे खातेदार ठेवीदारांचे ४४ लाख रुपये घेऊन फरार झाले आहे. या मुळे ठेवीदार खातेदारांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी पोलिसात बँक कर्मचारी गेले असता त्यांना तुम्ही कोर्टात जा असा सल्ला देण्यात आला. यामुळे कन्नड शहरात एकच खळबळ उडाली आहे . 
 
लासलगाव येथील मुख्य शाखेने कन्नड येथील शाखा सुरू करण्यासाठी १५ कर्मचारी भरती केले त्यांच्याकडून प्रत्येकी एक लाख रुपये डिपॉझिट म्हणून घेतले. या बँकेने कन्नडमध्ये तेवीस महिन्यांत सुमारे ३५० सेव्हिंग खातेदार व १०० ठेवीदार जोडले गेले. आज बँकेची स्थिती पाहता आज रोजी बँकेत फक्त दोन कर्मचारी आहेत बाकीच्यांनी राजीनामे दिले त्यांना दोन महिन्याने त्यांची रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले तर काहींना धनादेश दिले. मात्र तो धनादेश लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लासलगाव या बँकेचा दिला. परंतु  तो वटलाच नाही या मुळे हे बिंग फुटले. आता खातेदार व ठेवीदार बँकेत चकरा मारत असल्याने बँक कर्मचाऱ्याने पोलिस ठाणे गाठले.
 
बँकेत चेक वटलाच नाही 
संतोष लखू नागे याने नोकरीसाठी ९५ हजार रुपयांचा एफडी केला होता. या पोटी त्यांना दोन धनादेश दिले ते बाऊन्स झाले. या प्रकरणी पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  
 
पैसा उपलब्ध नाही 
- बँकेने ग्राहकांना आणि आम्हाला खोटे आश्वासन देऊन फसवणूक केली आहे. खातेदार पैशांची मागणी करत आहेत. मात्र वरिष्ठ शाखेतून पैसा उपलब्ध होत नाही.
गोरख चव्हाण, व्यवस्थापक शाखा कन्नड .
बातम्या आणखी आहेत...