आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याचा स्‍वर्ग गौताळा अभयारण्‍यात निसर्गाची मुक्‍त उधळण, पर्यटक-निसर्गप्रेमींना मोहिनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोज- रत्नाकर नागापूरकर - Divya Marathi
फोटोज- रत्नाकर नागापूरकर
औरंगाबाद - मराठवाड्याचा स्‍वर्ग म्‍हणून ओळखला जाणा-या गौताळा अभयारण्‍याचे सौंदर्य अल्‍पशा पावसानेही खुलून आले आहे. सुरुवातीला विश्रांती घेतल्‍यानंतर मागील एका आठवड्यापासून मराठवाड्यात पावसाचे वातावरण आहे. यामुळे कन्‍नड तालुक्‍यातील गौताळा अभयारण्‍यामध्‍ये निसर्गाची मुक्‍तहस्‍ताने उधळण सुरु असून हा बहरलेला निसर्ग पर्यटक आणि निसर्ग प्रेमींना साद घालत आहे.  
 
कन्‍नड तालुक्याच्या एकुण 1507.8 चौरस किलोमीटर भूभागापैकी तब्बल 260.61 चौरस किलोमीटर क्षेत्रावर गौताळ्याचे वनक्षेत्र आहे. सहयाद्री डोंगराच्या शेवटच्या रांगेत वसलेल्या सातमाळा डोंगर रांगेत गौताळा अभयारण्‍य, पितळखोरा लेणी, किल्ले अंतूर, धारकुंड आदी पर्यटनस्‍थळे आहेत. पर्यटक, संशोधक, इतिहासकार, वैदयकशास्त्र, वनस्पतीशास्त्र तसेच पशू-पक्षी यांचे संशोधक यांच्या दृष्टीने हा भाग वैभव संपन्न आहे. 
 
वन्यजीव आधिकाऱ्यांतला छायाचित्रकार
कन्नड गौताळा अभयारन्य येथे वनक्षेत्रपाल अधिकारी असलेले रत्नाकर नागापूरकर हे हौसी छायाचित्रकारही आहेत.  त्‍यांनी विविध पशुपक्षांची टिपलेली छायाचित्रे पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाइडवर.... 
 

                                    
बातम्या आणखी आहेत...