आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'स्मार्ट सिटी\'साठी अमृत योजनेचे काम शून्यच, औरंगाबाद मनपाचा कारभार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेच्या दुसऱ्या यादीत स्थान मिळवण्यासाठी तयारी करा, अशी सूचना गेल्याच महिन्यात औरंगाबाद मनपाला मिळाली. नियोजनाचा आराखडा, दाखल्यासाठी ९० दिवसांत काही कामे करण्यास सांगण्यात आले होते. या मुदतीचे ३० दिवस मंगळवारी पूर्ण झाले, पण या काळात कोणतेही ठोस काम मात्र झाले नसल्याचे आढळून आले आहे. यावर महापौर त्र्यंबक तुपेंसह पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, शहराचा कायापालट करणाऱ्या योजनेसाठी ढिम्मपणा का, असा सूर त्यांनी लावला आहे.

करवसुलीपासून ते स्वच्छतागृहाच्या बांधकामापर्यंतच्या सर्वच कामांत अक्षम्य ढिसाळ असलेल्या औरंगाबाद मनपाचा स्मार्ट सिटी, अमृत योजनेच्या पहिल्या यादीत समावेश झाला. मात्र, दुसऱ्या यादीत स्थान मिळवण्यासाठी ठोस प्रयत्न करावे लागतील, असेही सांगण्यात आले. केंद्राने पाठवलेल्या पत्रात प्रयत्नांचा आणि काही ठोस कामांचा तपशील आहे. त्यानुसार ९० दिवसांत स्वतंत्र सल्लागार समिती नेमावी, असे म्हटले होते. समित्या नेमण्यात वाकबगार मनपाने पुण्याच्या एका संस्थेची नियुक्ती केली. मात्र, या समितीने नेमके काय केले, याची माहिती कुणाकडेही नाही. या समितीने पाणीपुरवठा, करवसुली, स्वच्छतागृहे, सफाई, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रस्त्यांचे नूतनीकरण अशी कामे नेमकी कशी करावी. त्यावर किती खर्च अपेक्षित आहे, असा अहवाल महिनाभरात तयार करणे अपेक्षित होते. हा अहवाल अजून प्रतीक्षेत आहे. याच कालावधीत अमृत योजनेतील पाणी पुरवठा योजनेच्या नियोजनासाठी स्वतंत्र सल्लागार समिती नेमायची होती. ती नेमण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रत्येक घरात नळजोडणी, पाणी पुरवठा वितरण आणि व्यवस्था या कामांचा आराखडा तयार झाला नाही.
साताऱ्याच्या पाण्यासाठी अमृतसिटीचा आधार
अमृत योजनेवर अधिकाऱ्यांची तयारी करून घेण्यासाठी मुंबईत तीन दिवसांची कार्यशाळा झाली. त्यात शहर अभियंता सखाराम पानझडे, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार सहभागी झाले. सातारा-देवळाईच्या पाण्यासाठी अमृत योजनेत १५० कोटी निधी देण्याची मागणी त्यांनी तेथे केली.
उद्याने, हरितपट्टे, गटारींबाबत प्रश्नावर अधिकारी निरुत्तर
उद्याने, खुल्या जागांचा तसेच हरित पट्ट्यांचा विकास, ड्रेनेज यंत्रणा, रस्त्याच्या दुतर्फा गटारी आदींविषयी तुमच्या मनपाने काय केले, अशी विचारणा कार्यशाळेत झाली. तेव्हा त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, कोणती कामे करायची होती..