आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Council Of The Executive Board Of The Election Results Announced Friday

साहित्यप्रेमींनी परिवर्तन नाकारले, मसापमध्ये पुन्हा कौतुकाची शाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अतिशय चुरशीच्या आणि आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. साहित्यप्रेमींनी परिवर्तन नाकारल्याने पुन्हा एकदा कौतुकशाहीचे ढोल वाजले. परिवर्तन आघाडीच्या मागे असलेले आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्तक्षेपामुळे राजकीय रंग चढलेली ही निवडणूक अधिक रंगतदार झाल्याने परिवर्तन होते की काय, अशी परिस्थिती असतानाच आज झालेल्या मतमोजणीत विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांचे पॅनल निवडून आले. चव्हाण यांच्या पुढाकाराने रिंगणात उतरलेल्या परिवर्तन पॅनलचा दणदणीत पराभव झाला.

पाटील यांच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ २०११ मध्येच संपला होता. त्यानंतर सातत्याने निवडणूक लांबणीवर टाकली जात होती. अखेर साहित्यप्रेमींच्या दबावामुळे निवडणुका जाहीर झाल्या. त्यात आमदार चव्हाण यांनी उडी घेतल्याने प्रचारात रंगत आली होती. २२ जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणात होते. हजार ५७५ पैकी हजार २४६ मतपत्रिका साहित्य परिषदेत दाखल झाल्या. आज सकाळी १० वाजता डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात मतमोजणी झाली. निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. चंद्रदेव कवडे, सहायक निर्वाचन अधिकारी कैलास गौतम, प्रकाश तौर, संध्या मोहिते, भाऊसाहेब सोनटक्के यांच्यासह पन्नास सहकाऱ्यांनी काम पाहिले.