आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Country's First Agricultural Weather Station At Badanapur

देशातील पहिले कृषी हवामान केंद्र बदनापूरला, ६७ कोटी खर्च, जिल्ह्यांत वेधशाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत बदनापूर येथे कृषी हवामान संशोधन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. ६७ कोटी खर्चाच्या या केंद्राचे काम तीन टप्प्यांत होणार असून पर्जनमान्य, बाप्पीभवन, थंडी, तापमान, हवेचे प्रदूषण आदी बाबींचा अभ्यास करून उपाययोजना आखल्या जातील. या केंद्रामुळे १०० जणांना रोजगार मिळेल. प्रस्ताव मंजूर झाल्यास कृषी विद्यापीठांतर्गत देशातील हे पहिले केंद्र ठरेल. विद्यापीठाने मागील ३० वर्षांत मराठवाड्यातील जिल्हानिहाय पर्जन्यमानाचा अभ्यास केला. त्यानुसार १५ टक्के तीव्र, ९ टक्के अल्प व २३ टक्के मध्यम स्वरूपात दुष्काळ पडला. मराठवाड्यासाठी दुष्काळ नैसर्गिक असून बदलत्या हवामानाची त्यात भर पडली आहे. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता आणखी जाणवणार आहे. यावर मात करण्यासाठी या केंद्राची मोलाची मदत होईल, असा विश्वास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरल्लू यांनी व्यक्त केला.
असे असेल केंद्र
* २० हेक्टरवर केंद्र, ६७ कोटींची तरतूद
* १५ वर्षांचा प्लॅन, तीन टप्प्यांत पूर्तता
* ८ जिल्ह्यांत प्रत्येकी एक भूपृष्ठीय वेधशाळा
* ७८ तालुक्यांत हवामान केंद्रे
* ३० हवामान शास्त्रज्ञ, संगणक ऑपरेटर, अभियंता, कामगार असा १०० जणांना रोजगार
फायदा काय?
* मराठवाड्यात ५० लाख शेतकरी, लोकांना हवामान माहिती मिळेल
* पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, वादळ, गारपिटीचा अंदाज.
* कीडरोग रोखून उत्पन्नवाढीस लाभ.
* सूक्ष्म वातावरणानुसार पीकपद्धती विकसित.
* भूजल, वनस्पती संवर्धन तंत्रज्ञानाचा प्रसार करता येईल.