आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातिवाचक शिवीगाळ करणाऱ्या चौघांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- जोगेश्वरी येथील रमेश सोनकांबळे यांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी गावातील अप्पासाहेब वाघमारे, मदन वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, अरुण वाघमारे यांच्या विरोधात वाळूज पोलिस ठाण्यात शनिवारी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे ग्रामपंचायत सदस्या करुणाबाई सोनकांबळे यांचे पती आहेत. 
 
याबाबत अधिक माहिती अशी की, जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत असणाऱ्या रामराईत ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक बोअरच्या शेजारी गावातील अनेक नागरिकांना नियमबाह्यपणे बोअर घेतल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्या करुणाबाई सोनकांबळे गावातील इतर नागरिकांनी गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडे केली होती. या तक्रारीनंतर तहसीलदार शेळके यांनी तलाठी कृष्णा प्रेमभरे ग्रामविकास अधिकारी बी. एल. भालेराव यांना घटनास्थळाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
 
 या आदेशानुसार शुक्रवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास तलाठी प्रेमभरे ग्रामविकास अधिकारी भालेराव यांनी गावातील नागरिकांना सोबत घेऊन घटनास्थळाची माहिती घेण्यासाठी गेले होते. दरम्यान, तक्रारदार महिला सदस्याचे पती रमेश सोनकांबळे यांचा गावातील नागरिकांशी वाद झाला. या वादावादीनंतर तलाठी प्रेमभरे ग्रामविकास अधिकारी बी. एल. भालेराव हे पंचनामा करून घटनास्थळावरून निघून गेले. दरम्यान, पत्नी सदस्या असताना तू का लुडबुड करत आहेस, असे म्हणून अप्पासाहेब वाघमारे यांनी रमेश सोनकांबळे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याच वेळी घटनास्थळी सदस्या करुणाबाई सोनकांबळे आल्या पुढे वाद वाढला. त्या वेळी आरोपी अप्पासाहेब वाघमारेने रमेश सोनकांबळे यांना जातिवाचक शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यात वीट फेकून मारल्याची नोंद फिर्यादीत करण्यात आली आहे. 
 
याप्रकरणी रमेश सोनकांबळे यांच्या तक्रारीवरून अप्पासाहेब वाघमारे त्यांच्या तिघा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे हे करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...