आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्पणदिनी महिला पत्रकारांचा सत्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -दर्पण दिनानिमित्त जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे शहरातील महिला पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक धनंजय लांबे, दिलीप धारूरकर, अब्दुल कदीर, पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकर होते.

प्रमोद महाजन मराठी पत्रकार भवनामध्ये आयोजित या सोहळ्यात मान्यवरांनी ‘माध्यमातील महिलांची गरज’ या विषयावर मत व्यक्त केले. दर्पणदिनी महिलांचा सत्कार होणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे धनंजय लांबे म्हणाले. माध्यमातील महिलांनी पत्रकारितेकडे अर्धवेळ व्यवसाय म्हणून न पाहता करिअर म्हणून पाहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. काळाच्या ओघात माध्यमांचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून सध्या मोठय़ा प्रमाणात महिला पत्रकारितेकडे वळत असल्याचे दिलीप धारूरकर म्हणाले. लेखणीच्या माध्यमातून महिलांच्या समस्या समोर येणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. महिला पत्रकारांचा सत्कार करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. महिलांप्रमाणे पत्रकारितेतील ज्येष्ठांचा सत्कार व्हावा, अशी अपेक्षा अब्दुल कदीर यांनी व्यक्त केली. पत्रकारिता क्षेत्रात दिवसेंदिवस बदल होत असून नवनवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी सज्ज होणे आवश्यक असल्याचे खंडाळकर यांनी सांगितले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार नागेश गजवी, ‘दिव्य मराठी’चे सॅटेलाइट एडिटर र्शीपाद सबनीस, वृत्तसंपादक देविदास लांजेवार, चीफ रिपोर्टर र्शीकांत सराफ, डीबी स्टार प्रमुख रुपेश कलंत्री, सुनील वाघमारे, कानिफ अन्नपूर्णे, महादेव जामनिक, नरेंद्र लोंढे, अण्णा वैद्य यांची उपस्थिती होती. डॉ. अनिल फळे यांनी सूत्रसंचालन केले, तर बालाजी सूर्यवंशी यांनी आभार मानले.