आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Decision To Return The Amount Of Mobile Phone

नादुरुस्त मोबाइलची रक्कम परत करण्याचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - सिडकोतीलकॅनॉट येथील फोन केअर मोबाइल शॉपीमधून घेतलेला मोबाइल दोन महिन्यांत बिघडल्याने उपरोक्त मोबाइलची रक्कम हजार ६५० रुपये ग्राहकास परत देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष के. एन. तुंगार, सदस्य के. आर. ठोले संध्या बारलिंगे यांनी दिले आहेत.

मुकुंदवाडी येथील भास्करराव पांडुरंग सुरडकर यांनी मुलीसाठी कॅनॉट प्लेस येथील फोन केअर मोबाइल शॉपीमधून २५ मार्च २०१४ रोजी हजार ६५० रुपयांत मोबाइल विकत घेतला. परंतु मोबाइल दोन महिन्यांत नादुरुस्त झाला सारखा बंद पडू लागला. शॉपमध्ये जाऊन त्यांनी तक्रार नोंदवली असता त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. मोबाइल कंपनी एस. मोबॅलिटी लि. एस ग्लोबल नॉलेज पार्क, १९-ए १९-बी, सेक्टर १२५, नाेयडा, उत्तर प्रदेश यांना पत्र पाठवून बघितले. परंतु दखल घेतली नाही. ग्राहकाने ग्राहक सेवा केंद्र स्पाइस मोबॅलिटी लि. शारदा मोबाइल आणि गिफ्ट सेंटर सी-५ ब्लॉक नं. ११, नारायण प्लाझा, कॅनॉट यांच्याकडे हँडसेट दुरुस्तीसाठी दिला. मोबाइल घेतल्यानंतर परत केला नाही म्हणून मंचात धाव घेण्यात आली. मंचाने सुनावणीत मोबाइलची रक्कम ७६५० रुपये ग्राहकास देण्याचे आदेश दिले. तक्रारीचा खर्च म्हणून अडीच हजार रुपये परत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तक्रारदाराने स्वत: मंचात आपली बाजू मांडली.