आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विभागाने भरला १000 कोटी रुपये आयकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आयकर भरण्यात यंदा औरंगाबाद विभागाने एक हजार कोटींचा पल्ला गाठला आहे. यात सामान्य नागरिकांसह व्यापारी वर्ग अन् औरंगाबाद विभागातील उद्योग क्षेत्राचा जवळपास ६० टक्के वाटा आहे. पुढील आर्थिक वर्षात लाख २० हजार करदाते वाढवण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने औरंगाबाद विभागाला दिले आहे.

"दिव्य मराठी'ने विभागाचा आर्थिक वर्षाचा आढावा घेतला. विभागात शहरासह बीड, जालना, परभणी, नांदेड, लातूर या शहरांचा समावेश होतो. विभागाचे आर्थिक वर्षाचे लक्ष्य १२०० कोटी रुपये होते. त्यापैकी ३१ ऑगस्टपर्यंत हजार कोटी रुपये एवढे लक्ष्य पूर्ण केले. संपूर्ण ताळेबंद अजून पूर्णपणे आलेला नाही.

आयकर भरणे राष्ट्रीय कर्तव्य..
अनेक लोक नोकरदार असल्याने फक्त फॉर्म-१६ कंपनी भरते म्हणून विभागाकडे रिटर्न भरत नाहीत; पण प्रत्येकाने आयकर विभागाचा रिटर्न फाॅर्म भरला पाहिजे. प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे. यासाठी आम्ही शालेय स्तरावरून ही जागरूकता आणत आहोत. औरंगाबाद विभागाने हजार कोटींचा भरणा केला आहे. शिवदयाल श्रीवास्तव, प्रधानआयुक्त, आयकर विभाग, औरंगाबाद

शाळांमध्ये केले प्रबोधन
आयकर म्हटले की, भल्याभल्यांना घाम फुटतो. कर भरणा म्हणजे डोकेदुखी, असे समजून त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची मोठी संख्या आपल्या देशात आहे. त्यामुळे आयकर विभाग शाळांमध्ये जाऊन शालेय विद्यार्थ्यांना माहिती देत आहे.

- आयकर विभाग पूर्वीपेक्षा खूप सहज आणि समाजाभिमुख होत आहे.
५० ठिकाणी सर्व्हे करून ३० कोटींचा कर गोळा केला आहे. जेथे कर बुडवेगिरी होत आहे, तेथे धाडींएेवजी सर्व्हे असा बदल केला आहे.

१५ हजार नोटिसा
- यंदा आयकर विभागाला हजार कोटी रुपयांचा कर गोळा करण्यासाठी तब्बल पंधरा हजार नोटिसा पाठवाव्या लागल्या.
- धाडी टाकण्यापेक्षा कर लपवणारे किंवा करबुडव्यांना भेटी देऊन किंवा स्मरणपत्रेवजा नोटिसा देऊन जास्तीत जास्त कर गोळा करण्यावर भर आहे.

बिल्डरांना दुष्काळाचा फटका

यंदा दुष्काळ असल्याने बिल्डरांना मोठा अार्थिक फटका बसल्याचे आयकर विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यांच्या नुकसानीचा आकडा यंदाचे अॅडव्हान्सेस आल्यावर कळेल, असे सूत्रांनी सांगितले.