आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Development Of Urban Co operative Bank Election

"लोकविकास'च्या रिंगणात उद्योजक आणि नेते उतरले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - १०७ कोटी रुपयांच्या ठेवी असलेली लोकविकास बँक ताब्यात घेण्यासाठी दिग्गज उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे नेहमी बिनविरोध ठरणारी बँकेची निवडणूक चुरशीची बनली आहे. या निवडणुकीनिमित्त उद्योजक राजकारणी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत हायटेक प्रचार केला जात आहे.
नागरी सहकारी बँकांमध्ये महत्त्वाची बँक म्हणून लोकविकास नागरी सहकारी बँक ओळखली जाते. या बँकेची निवडणूक ३१ जानेवारीला आहे. शहरात मोठमोठे होर्डिंग्ज लावल्यामुळे तसेच हायटेक प्रचार यंत्रणेमुळे निवडणुकीत रंगत आली आहे.

१९ वर्षांत दुसऱ्यांदा निवडणूक : याबँकेची स्थापना १९९६ मध्ये झाली. तेव्हापासून सातत्याने बँकेची निवडणूक बिनविरोध झालेली आहे. २०११ मध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली होती. त्या वेळी नामदेव पवार अर्जुन गायके यांच्या लोकविकास बँक आदर्श पॅनलसोबतच एकनाथ जाधव यांनी निवडणूक लढवली. या वेळी जाधव लोकविकास बँक एकता पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत.

प्रचंड चुरस :बँक ताब्यात ठेवण्यासाठी उद्योजक आणि राजकारणी मैदानात उतरले आहेत. यात आदर्श पॅनलचे अर्जुन गायके, माजी आमदार नामदेव पवार, मदन पोतदार, विजय खाचणे, नवनाथ डांगे, प्रदीप बुरांडे या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे, तर एकता पॅनलमध्ये जे. के. जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या पत्नी अनुराधा दानवे, प्रशांत देसरडा या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. राजकीय उमेदवारीमुळे या निवडणुकीत अधिक चुरस पाहायला मिळत आहे.

बँकेचा कारभार पारदर्शी करणार
^मागील कार्यकाळात भ्रष्टाचाराची प्रकरणे घडली. नातेवाइकांनाच कर्ज वाटप केले. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना हटवून बँकेचा कारभार पारदर्शी करणे आमचे ध्येय आहे. आम्ही केलेल्या कामामुळेच बँकेची प्रगती झाली आहे. एकनाथजाधव, प्रमुख,लोकविकास बँक एकता पॅनल

विकासासाठी आमचे पुढचे पाऊल
^पाच वर्षांत बँकेच्या शाखा चारवरून अकरापर्यंत, तर ठेवी ५० कोटींवरून १०७ कोटींपर्यंत नेल्या. आगामी काळात ठेवी २०० कोटींपर्यंत नेण्याचा मानस आहे. राजकारण्यांना दूर ठेवून विकासासाठी आमचे पुढचे पाऊल असेल. अर्जुनगायके, प्रमुख,लोकविकास आदर्श पॅनल
प्रचारासाठी हायटेक

तंत्राचा वापर
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा हायटेक प्रचार केला जात होता. आता बँकेच्याही निवडणुकीचा प्रचार हायटेक पद्धतीने केला जात आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, व्हॉइस मेसेज, एसएमएस, डिजिटल मार्केटिंग होल्डिंगच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पाेहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

साडेसात हजार मतदार ठरवणार निकाल
या बँकेत १०७ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. २०१६ ते २०२० अशा चार वर्षांसाठी संचालक मंडळ निवडीकरिता ही निवडणूक होत असून दोन्ही पॅनलकडून जोरदार प्रचार सुरू आहे. यासाठी ३१ जानेवारीला चार ठिकाणी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सात हजार पाचशे दहा मतदार असून त्यापैकी जवळपास साडेसहा हजार मतदार शहरातील आहेत. उर्वरित मतदार ग्रामीण भागातील आहेत.