आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"स्किल इंडिया'त महिलांचा सहभाग महत्त्वाचा : रहाटकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारत सरकार"स्किल इंडिया' उपक्रम राबवत आहे. मात्र, भारतीय स्त्री ही आधीपासूनच "स्किल'ने काम करत आहे. या माध्यमातून स्त्रियांनी आपली शक्ती ओळखून समाजात स्वत:चे स्थान निर्माण केले पाहिजे, असे मत भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले.

रूपांतरण एकात्मिक युवा प्रतिष्ठानच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. रहाटकर म्हणाल्या, घरातील सर्व व्यवहार करताना पालकांनी आपल्या मुलांनाही त्यात सहभागी करावे. छोट्या-मोठ्या निर्णयात आपण मुलांची मते जाणून घेणे आवश्यक आहे. आज आपण मुलांना सर्वांच्या एकमताने निर्णय घेण्याची सवय लावली तरच पुढील काळात ही मुले पालकांच्या मताला महत्त्व देतील, असा सल्लाही त्यांनी दिला. गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतावणे, देवगिरी बँकेच्या संचालिका विमल तळेगावकर, शौर्य युवक प्रतिष्ठानचे ऋषिकेश कविमंडळ, भूषण काळे, अध्यक्ष सचिन वैद्य, सचिव आशिष सुरडकर, पंकज पाडळकर, प्रल्हाद देशपांडे, प्रशिक्षिका सारिका जोशी, विजेता दांडगे, पल्लवी सुरडकर, मकरंद देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

घडवणे महत्त्वाचे
आधुनिकयुगात स्पर्धा वाढल्या आहेत. मात्र, या स्पर्धांच्या युगातही मुलांना योग्य मार्गदर्शन करून स्पर्धांच्या मागे लागता मुलांना संस्कार आणि शिक्षणाच्या माध्यमातून घडवले पाहिजे. त्यासाठी सुजान पालक घडवणेदेखील तेवढेच महत्त्वाचे असल्याचे मत गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतावणे यांनी व्यक्त केले.

अभिलाषा, शिवानी ठरल्या चॅम्पियन
वर्धापनदिनानिमित्त अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोठ्या गटात अभिलाषा शेळकेेने प्रथम क्रमांक पटकावला तर यश जोगदंड आणि विश्वजित खंदारे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थानी राहिले. तर लहान गटात शिवानी फुके-प्रथम, सत्यजित खंदारे-द्वितीय आणि गौरव रघू याने तृतीय क्रमांक पटकावला. या व्यतिरिक्त प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या शिवनकला प्रशिक्षण वर्गातील महिलांनाही मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. रूपांतरण चित्रकला स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांनाही या वेळी पारितोषिक वितरण करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...