आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगप्रसिद्ध वेरुळ लेणी ते वेरुळ पर्यटक केंद्र, बॅटरीवरील बसेस जानेवारीत धावणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरुळ - जगप्रसिद्ध वेरुळ लेणी ते वेरुळ पर्यटक केंद्र असा बॅटरी बस मार्ग नवीन वर्षात सुरू होणार असून सध्या त्याचे काम प्रगतिपथावर आहे.
वर्षभरापासून वेरुळ लेणीचे वाहनतळ वेरुळ पर्यटक केंद्रात आल्यापासून पर्यटकांकरिता पर्यटक केंद्र ते वेरुळ लेणी अशा एसटी महामंडळाच्या बसेस चालू आहेत. लवकरच येथे बॅटरीवर चालणाऱ्या बसेस चालू करण्यात येणार आहेत. याकरिता एमटीडीसीच्या माध्यमातून लक्ष्मी कन्स्ट्रक्शन पुणे ही कंपनी या रस्त्याचे काम करीत असून आतापर्यंत या रस्त्याचे ग्रॅन्युअल सबबेस, वेटमिक्स मेकॅडम पूर्ण झाले असून सध्या रोलिंग विथ व्हायब्रेटर रोलर, भूमिगत व बाजूच्या नाल्याचे पीसीसी काम चालू असून यानंतर अंतिम टप्प्यात ड्रायक्लीन काँक्रीट आणि रोड काँक्रीट होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...